धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 18:24 IST2021-03-09T18:23:32+5:302021-03-09T18:24:48+5:30
A policeman on night patroling was killed विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल या पदावर नेमणूक होती.

धक्कादायक ! अज्ञात वाहनाच्या धडकेत रात्र गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू
गेवराई : रात्रगस्तीवर असलेल्या गेवराई पोलीस ठाण्यातील एका पोलिस कर्मचाऱ्याचा अज्ञात वाहनाच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना धूळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर गढीच्या उड्डाणपुलावर मंगळवार पहाटेच्या सुमारास घडली.
विवेक सदाशिव कांबळे (वय 34) असे मयत पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून त्यांची गेवराई पोलीस ठाण्यात कॉन्स्टेबल या पदावर नेमणूक होती. नेहमीप्रमाणे विवेक कांबळे आणि त्यांचे सहकारी पोलीस नाईक बबन वडते हे रात्रीच्या गस्तीवर निघाले. गढीच्या उड्डाणपुलावर विवेक यांनी आपली पोलिस व्हॅन थांबवली आणि ते गाडीच्या खाली उतरले. तेवढ्यातच एका अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली आणि त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी गेवराईच्या उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.
विवेक कांबळे हे बीडच्या पंचशील नगरचे रहिवासी असून 2010 मध्ये पोलीस खात्यात भरती झाले होते. 2016 पासून ते गेवराई पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल या पदावर कार्यरत होते.