धक्कादायक ! शेजाऱ्याच्या छेडछाडीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 13:36 IST2021-02-25T13:35:09+5:302021-02-25T13:36:18+5:30
women suicide शेजारी राहणारा तरुण छेड काढून बदनामी करत असल्याने कंटाळून विवाहित महिलेची आत्महत्या

धक्कादायक ! शेजाऱ्याच्या छेडछाडीला कंटाळून विवाहितेची आत्महत्या
कडा ( बीड ) : शेजारी राहणाऱ्या तरुणाकडून सातत्याने होणाऱ्या छेडछाडीला आणि त्यातून झालेल्या बदनामीला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना दि. ११ रोजी घडली होती. याप्रकरणी बुधवारी विनोद साहेबराव घाटविसावे याच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले आहे.
आष्टी तालुक्यातील धामणगांव येथील विनोद साहेबराव घाटविसावे हा तरुण घराशेजारी राहत असलेल्या मनिषा प्रदिप साळवे ( 25) या विवाहितेची वारंवार छेड काढत असे. तसेच समाजात बदनामी करून तिला मानसिक त्रास देत असे. हा त्रास सातत्याने होत असल्याने कंटाळून मनीषाने ११ फेब्रुवारीस घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी मयत महिलेचा भाऊ विकास आबासाहेब मकासरे ( रा. वांबोरी ता. राहुरी ) याच्या फिर्यादीवरून अंभोरा पोलिस ठाण्यात बुधवारी ( दि. २४ ) सायंकाळी मनिषा प्रदिप साळवेस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी विनोद साहेबराव घाटविसावे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत अवघ्या दोन तासात आरोपीस आष्टी शहरातून अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक राहुल लोंखडे यांनी उपअधीक्षक विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांच्या मार्गदर्शनाखाली केली.