खळबळजनक! परळीजवळ कन्हेरवाडी परिसरात गुत्तेदाराची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2023 16:13 IST2023-07-01T16:13:07+5:302023-07-01T16:13:26+5:30
हत्या कोणी आणि का केली याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलीस तपास सुरु आहे.

खळबळजनक! परळीजवळ कन्हेरवाडी परिसरात गुत्तेदाराची हत्या
परळी: तालुक्यातील कन्हेरवाडी येथील कॉन्ट्रॅक्टर बंडू मुंडे यांची हत्या झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. परळी -अंबाजोगाई रस्त्यावरील कन्हेरवाडी परिसरात मुंडे यांचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
माहिती मिळताच घटनास्थळी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर, पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, प्रभारी पोलीस निरीक्षक चंद्रकांत गोसावी, सपोनि भार्गव सपकाळ आदी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी लोखंडी रॉड आढळून आला आहे. हत्या कोणी आणि का केली याचा अद्याप उलगडा झाला नसून पोलीस तपास सुरु आहे.