घरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2024 16:30 IST2024-04-04T16:29:31+5:302024-04-04T16:30:08+5:30
धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगतच्या घरातून आढळला मृतदेह

घरात कुजलेल्या अवस्थेत महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ
- नितीन कांबळे
कडा (बीड) - धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगत अर्धवट बांधकाम झालेल्या घरात अंदाजे ३५ ते ४५ वर्षीय महिलेचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह गुरूवारी सकाळी अकराच्या दरम्यान आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.ती महिला कोण,कुठली,तिचा घातपात झाला की नैसर्गिक मृत्यू झाला याचा शोध लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
आष्टी तालुक्यातील अंभोरा पोलिस ठाणे हद्दीतील धानोरा परिसरातील पिंपरखेड रोडलगत असलेल्या एका नवीन घराचे बांधकाम सुरू असलेल्या घरात कुजलेला मृतदेह असल्याची माहिती अंभोरा पोलिसांना समजाताच सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी धाव घेतली. कुजलेला मृतदेह हा महिलेचा असून साधारण ३५ ते ४५ वर्ष वय असल्याचा अंदाज आहे.साधारण आठ दिवसापुर्वीचा हा मृतदेह आहे.
मृतदेह कुजलेला असल्याने जाग्यावरच शवविच्छेदन करण्यात आले आहे.ठाणे हद्दीतून कोणी महिला मिसींग असेल तर त्यानी माहिती द्यावी.महिलेची ओळख पटवण्यासाठी शोध पत्रिका पाठवण्यात आली असल्याचे अंभोरा पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे यांनी केले आहे. घटनास्थळी सहायक पोलीस निरीक्षक मंगेश साळवे,पोलीस उपनिरीक्षक देवीदास सातव, पोलीस अंमलदार सुदाम पोकळे,सतीश पैठणे,यांनी भेट देऊन पंचनामा केला.
..