शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

चाक फुटल्याने शिवशाही बस उभ्या बैलगाडीवर आदळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 07, 2019 11:40 PM

परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली.

बीड : परळीहून प्रवाशी घेवून पुण्याकडे निघालेल्या शिवशाही बसचे अचानक टायर फुटले अन् ती बस रस्त्यालगत उभ्या असणाऱ्या बैलगाडीवर आदळली. या अपघातात बैलगाडीचे मोठे नुकसान झाले. यात बसमधील कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. ही घटना बीड-पाटोदा रस्त्यावरील लिंबागणेश नजीक ७ नोव्हेंबर रोजी सकाळी घडली. माहिती मिळताच एस.टी.महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी रवाना झाले.राज्य परिवहन महामंडळाने करार तत्वावर शिवशाही बस प्रवाशांच्या सेवेसाठी राज्यभरात सुरु केलेल्या आहेत. मात्र, प्रवास करताना अनेकदा या बस बंद पडण्याचे प्रकार घडलेले आहेत. असे असतानाच गुरुवारी लिंबागणेशजवळ शिवशाही बसचे टायर फुटले. परळी येथून पुण्याकडे निघालेली बस (एम.एच.१४/२४६०) ही मांजरसुंब्याहून पुढे लिंबागणेशकडे धावत असतांना अचानक बसचे समोरील टायर फुटले. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने बस रस्त्याच्या बाजूला घेण्याचा प्रयत्न केला.सध्या मांजरसुंबा ते पाटोदा या चारपदरी सिमेंट रस्त्याचे काम सुरु आहे. बस बाजूला घेतांना रस्त्यालगत उभ्या बैलगाडीवर जावून ती आदळली. यात बैलगाडी अक्षरश: खिळखिळी झाली. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. सुदैवाने यात बसमधील एकही प्रवाशी जखमी झाला नाही. इतर बसने प्रवाशांना पुढील प्रवासासाठी बसवून देण्यात आले.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातShivshahiशिवशाही