पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 17:12 IST2021-02-05T17:12:26+5:302021-02-05T17:12:53+5:30
शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध

पेट्रोल-डिझेल, गॅस दरवाढी विरोधात शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा
अंबाजोगाई : पेट्रोल व डिझेल दरवाढीचा तसेच गॅसची सबसिडी कमी केल्याचा निषेधार्थ शिवसेनेच्यावतीने शुक्रवारी बैलगाडी मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.
देशात पेट्रोलचे भाव शंभर रूपये तर डिझेल देखील नव्वद रुपय लिटरच्या जवळ पोहोचले आहे. या दरवाढीमुळे गोरगरीब जनतेचे कंबरडे मोडले आहे. गॅस सबसिडी ही अत्यल्प दिली जात आहे. यामुळे सर्वसामन्य जनता त्रस्त झाली आहे. याच्या निषेधार्त शिवसेनेच्यावतीने बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. यावेळी आंदोलकांनी केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मोर्चात शिवसेना तालुकाप्रमुख अर्जुन वाघमारे, शहर प्रमुख गजानन मुडेगावकर, जि.सहसंघटक अशोक गाढवे, शिवाजी कुलकर्णी, नागेश कुंभार,खंडु पालकर,नाथराव मुंडे, वसंत माने,उपशहरप्रमुख गणेश जाधव,शिवकांत कदम, अर्जुन जाधव, नागेश सावंत,मुशीर बाबा, श्रीधर गरड, विशाल कुलकर्णी, अनिरुद्ध पांचाळ,बिटु चाटे, अभिमन्यू वैष्णव, अवधूत कुलकर्णी,शिवानंद मोरे, सुधाकर काचरे, हनुमंत हावळे,राम मगर, समाधान पिसाळ, धर्मराज मोरे,माणिक सोनवणे,बंडु मोरे, कानिफनाथ हारणे, महादेव पांचाळ आदींसह शिवसैनिकांची मोठी उपस्थिती होती.