शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

शेतकर्‍यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा माजलगाव तहसिलवर धडकला 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2017 7:42 PM

उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते  

माजलगाव (बीड) : उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते  

माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहे त्यामुळे येथे उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होते. मात्र कारखान्यांनी शेतकर्‍यांच्या हिताच्या 265 जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे याची नोंद घ्यावी, उसाला ३००० रुपये भाव द्या. तसेच बोंडअळीमुळे झालेले नुकसानिची भरपाई द्यावी,  विज बील माफ करण्यात यावे, 24 तास विज पुरवठा करावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली ऑनलाईन प्रक्रिया रद्द करावी आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या. 

याप्रसंगी बोलतांना सचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतकर्‍यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांशी देणे घेणे नाही. प्रास्ताविकात आप्पासाहेब जाधव बोलतांना म्हणाले, सक्तीची वीज बिल वसुली करत महावितरणने लुट चालवली आहे. 

यात सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, शहरप्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुकाअधिकारी अ‍ॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्‍वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

२०० बैलगाड्यांचा सहभाग तालुक्यात शेतकर्‍यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा निघाला होता. यात जवळपास 200 बैलगाड्या सहभागी होत्या. यामुळे शहरात 2 कि.मी. पर्यंत बैलगाड्यांची रांग लागली होती. 

टॅग्स :FarmerशेतकरीShiv Senaशिवसेना