शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा माजलगाव तहसिलवर धडकला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2017 19:43 IST2017-12-20T19:42:14+5:302017-12-20T19:43:00+5:30
उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते

शेतकर्यांच्या विविध मागण्यासाठी शिवसेनेचा बैलगाडी मोर्चा माजलगाव तहसिलवर धडकला
माजलगाव (बीड) : उसाला रास्त भाव द्या, बोंडअळीग्रस्त शेतक-यांना नुकसान भरपाई द्या यासह शेतक-यांच्या अन्य मागण्यांसाठी शिवसेनेन आज तहसील कार्यालयावर बैलगाडी मोर्चा काढला. यात शिवसेना पदाधिका-यांसोबत तालुक्यातील शेतकरी २०० बैलगाड्यातून सहभागी झाले होते
माजलगाव तालुका सिंचनाच्या दृष्टीने अत्यंत प्रगत आहे त्यामुळे येथे उसाचे उत्पादन मोठ्याप्रमाणावर होते. मात्र कारखान्यांनी शेतकर्यांच्या हिताच्या 265 जातीच्या ऊसाची नोंद घेणे बंद केले आहे याची नोंद घ्यावी, उसाला ३००० रुपये भाव द्या. तसेच बोंडअळीमुळे झालेले नुकसानिची भरपाई द्यावी, विज बील माफ करण्यात यावे, 24 तास विज पुरवठा करावा, शेतीमाल विक्रीसाठी लादण्यात आलेली ऑनलाईन प्रक्रिया रद्द करावी आदी मागण्या या मोर्चात करण्यात आल्या.
याप्रसंगी बोलतांना सचिन मुळूक म्हणाले, प्रशासन शेतकर्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करत आहे. तसेच जिल्ह्याच्या पालकमंत्री व स्थानिक आमदारांना शेतकर्यांच्या प्रश्नांशी देणे घेणे नाही. प्रास्ताविकात आप्पासाहेब जाधव बोलतांना म्हणाले, सक्तीची वीज बिल वसुली करत महावितरणने लुट चालवली आहे.
यात सहसंपर्कप्रमुख चंद्रकांत नवले, जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे, उपजिल्हाप्रमुख नारायण काशिद, तालुकाप्रमुख सतिष सोळंके, शहरप्रमुख अशोक आळणे, युवासेनेचे तालुकाअधिकारी अॅड.दत्ता रांजवण, डॉ.उध्दव नाईकनवरे, रमेश खामकर, प्रल्हाद सोळंके, विश्वनाथ नंदिकोल्हे, अमोल डाके, अनंत सोळंके, दासु पाटील बादाडे, संजय शिंदे, माऊली काशिद, विठ्ठल जाधव, सतिष बोठे, सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
२०० बैलगाड्यांचा सहभाग
तालुक्यात शेतकर्यांच्या मागण्यासाठी प्रथमच शिवसेनेच्या वतीने भव्य असा बैलगाडी मोर्चा निघाला होता. यात जवळपास 200 बैलगाड्या सहभागी होत्या. यामुळे शहरात 2 कि.मी. पर्यंत बैलगाड्यांची रांग लागली होती.