शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्ष फरार, मात्र राजकीय कारकीर्द जोरात; अखेर शिंदेसेनेचा जिल्हाध्यक्ष बाबू कांबळत गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 15:47 IST

खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी अंभोरा पोलिसांची मोठी कारवाई; आष्टी न्यायालयाने सुनावली २ दिवसांची कोठडी

कडा : गेल्या १० वर्षांपासून पोलिसांच्या हातावर तुरी देऊन फरार असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षाला अंभोरा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. बाबू सुब्रमण्यम कांबळत असे या नेत्याचे नाव असून, २०१६ मध्ये एका पवन ऊर्जा प्रकल्पावरील मजुरावर प्राणघातक हल्ला केल्याच्या गुन्ह्यात तो मुख्य आरोपी होता. या अटकेमुळे राजकीय आणि गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

आष्टी तालुक्यातील सावरगाव (मायंबा) येथील पवन ऊर्जा प्रकल्पावर काम करणारे मजूर अनिल प्रभाकर म्हस्के यांच्या पगारावरून २०१६ मध्ये वाद झाला होता. या वादातून बाबू कांबळत याच्यासह १२ जणांच्या टोळीने म्हस्के यांच्यावर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यात म्हस्के गंभीर जखमी झाले होते. अंभोरा पोलीस ठाण्यात याप्रकरणी १२ जणांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. मंगळवारी अंभोरा पोलिसांनी सापळा रचून कांबळतला अटक केली. त्याला आष्टी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याची गुन्ह्यातील पार्श्वभूमी विचारात घेऊन दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या कारवाईमुळे फरार गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे.

११ जणांची झाली होती सुटकाया प्रकरणातील इतर ११ आरोपींना पोलिसांनी यापूर्वीच अटक केली होती. मात्र, पुराव्याअभावी न्यायालयाकडून त्यांची निर्दोष मुक्तता झाली होती. परंतु, बाबू कांबळत हा गुन्हा घडल्यापासून पोलिसांना गुंगारा देत होता. फरार असूनही त्याची राजकीय कारकीर्द सुरूच होती आणि तो शिवसेना शिंदे गटाचा अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यरत होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Shinde Sena District Head Arrested After 10 Years on the Run

Web Summary : Shiv Sena (Shinde faction) Ahmednagar district head Babu Kambalat arrested after a decade on the run. He was the main accused in a 2016 assault case on a worker at a wind energy project. Despite being a fugitive, he continued his political career.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडAhilyanagarअहिल्यानगरArrestअटक