बीड जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 23:41 IST2018-05-15T23:41:17+5:302018-05-15T23:41:17+5:30
घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली.

बीड जिल्ह्यातील ‘त्या’ महिलेची मृत्यूशी झुंज अपयशी
लोकमत न्यूज नेटवर्क
विडा : घरगुती किरकोळ कारणावरून पतीने पत्नीला हातपाय बांधून पेटविल्याची घटना केज तालुक्यातील विडा येथे आठवड्यापूर्वी घडली होती. यामध्ये महिला ९० टक्के भाजली. तिच्यावर अंबाजोगाई येथील स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू होते. आठवडाभर तिने मृत्यूशी झुंज दिली. परंतु ती अपयशी ठरली आणि मंगळवारी दुपारच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. उशिरापर्यंत ठाण्यात नोंद झालेली नव्हती. या घटनेत घरातील किरकोळ कारणाने एकीचा जीव गेला.
अश्विनी (२३ रा.विडा) असे मयत महिलेचे नाव आहे. तर समिर जाधव असे तिच्या पतीचे नाव आहे. ८ मे रोजी समीर आणि अश्विनी यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाले. यावेळी समीरने अश्विनीचे बाजूलाच पडलेल्या दोरीन हातपाय बांधले. त्यानंतर रॉकेल अंगावर टाकून तिला पेटवून दिले होते. हा प्रकार मुलांनी पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. शेजारच्यांनी धाव घेत महिलेला अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. आठ दिवस तिच्यावर उपचार करण्यात आले. उपचार सुरू असतानाच मंगळवारी दुपारी तिचा मृत्यू झाला.
दरम्यान, महिलेने मृत्यूपूर्व जबाबात अंगावर चिमणी पडून आपण जळाल्याचे सांगितले होते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतर तिने जबाब बदलला होता. आता नातेवाईकांच्या जबाबावरून पुढील कारवाई होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नाही.