शरद पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:22 IST2019-05-13T00:21:23+5:302019-05-13T00:22:07+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री खा. शरद पवार हे सोमवारी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.

शरद पवार आज बीड जिल्हा दौऱ्यावर
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा माजी कृषीमंत्री खा. शरद पवार हे सोमवारी जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. यात ते शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. जनावरांच्या छावण्यांनाही भेटी देऊन जळालेल्या फळबागांचीही पहाणी करणार आहेत.
आष्टी तालुक्यातील खडकत येथे शरद पवार हे सकाळी साडेदहा वाजता येतील. तेथे ते शेतक-यांशी संवाद साधून अडचणी जाणून घेतील. त्यानंतर सकाळी ११.४५ वाजता पाटोदा तालुक्यातील सौताडा येथील गुराच्या छावणीस भेट देणार आहेत. दुपारी १.१५ वाजता ते नवगण राजुरी, जि.बीड येथील गुरांच्या छावणीस भेट देऊन त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधतील. दुपारी ३.३० वाजता ते पिंपळवंडी, ता.पाटोदा येथील गुरांच्या छावणीस भेट देणार आहेत, तसेच जळालेल्या फळबागांची पहाणीही करणार असून, त्यानंतर बारामतीकडे रवाना होणार आहेत. त्यांच्या समवेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजी आ.अमरसिंह पंडित, जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब आजबे, संदीप क्षीरसागर, सतीश शिंदे, महेंद्र गर्जे आदी असणार आहेत.