Sharad Pawar : सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2024 14:09 IST2024-12-21T14:07:28+5:302024-12-21T14:09:00+5:30

Sharad Pawar : खासदार शरद पवार यांनी आज बीड येथील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली.

Sharad Pawar took responsibility for the education of Sarpanch santosh Deshmukh's daughter; took the family's advice | Sharad Pawar : सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले

Sharad Pawar : सरपंच देशमुखांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली; कुटुंबीयांना भेटले

Sharad Pawar ( Marathi News ) : बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतीतल आरोपांवर कारवाई करण्याची मागणी सुरू आहे. हे प्रकरण हिवाळी अधिवेशनातही गाजले आहे. दरम्यान, आज खासदार शरद पवार यांनी देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी त्यांनी सरपंच देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली. आज मस्साजोग येथे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील खासदार बजरंग सोनावणे, निलेश लंके,राजेश टोपे आणि संदीप क्षीरसागर यांनी कुटुंबीयांची भेट घेतली.

"भागवतजी, या लोकांना सत्तेवर बसवणारेही तुम्हीच आहात"; संजय राऊत काय बोलले?

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले, हत्येचा तपास खोलात जाऊन करण्याची गरज आहे. राज्य सरकारने त्यांच्या कुटुंबियांना मदत जाहीर केली आहे, पण या मदतीने दु:ख कमी होत नाही, त्यामुळे या हत्या प्रकरणाचा तपास खोलात जाऊन सूत्रधारांना धडा शिकवला पाहिजे, असंही पवार म्हणाले. ही घटना न शोभणारी आहे. देशमुख कुटुंबाला न्याय दिला पाहिजे. आपण त्यांच्यासोबत आहे, असंही पवार म्हणाले. 

मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी शरद पवारांनी घेतली

शरद पवार म्हणाले, एकदा आपण सगळ्यांनी सामुदायिक प्रयत्नांची भूमिका घेतल्यानंतर आपल्याला कुणीही अडवू शकत नाही. आज आम्ही इथे पोहोचलो कारण, महाराष्ट्रात अशी घटना घडते हे न शोभणारे आहे. न्याय हा दिलाच पाहिजे, जे दु:खी आहेत त्या दु:खात ते एकटे नाहीत, त्यांच्या दु:खात आपण सहभागी आहोत. ही स्थिती दुरुस्त कशी होईल याची काळजी आपण घेतली पाहिजे. कुटुंबात लहान मुल आहेत. त्यांच्या मुलीला मी आताच सांगितले, तुझ्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहे, या मुलांचं आपण पूर्ण शिक्षण करु, असंही शरद पवार म्हणाले. 

"जे झालंय ते आपण बदलू शकत नाही. पण आता आपण त्यांना धीर देऊ शकतो. आत्मविश्वास वाढवू शकतो. ते एकटे नाहीत ही भावना निर्माण करु शकतो. ते काम आपण सगळे मिळून करु. राज्य सरकार आणि केंद्र सरकार याच्या खोलात जात नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही, हा विश्वास देतो, असंही पवार म्हणाले. 

Web Title: Sharad Pawar took responsibility for the education of Sarpanch santosh Deshmukh's daughter; took the family's advice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.