मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2025 12:50 IST2025-05-01T12:49:38+5:302025-05-01T12:50:04+5:30
वंजारवाडी येथून कांदा भरण्यासाठी हिवरा येथे जात असताना कड्याजवळ येताच पिकअपचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात २२ मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली.

मजुराला घेऊन निघालेल्या पिकअपचे टायर फुटून झालेल्या अपघातात अनेक जण गंभीर जखमी
नितीन कांबळे
कडा- वंजारवाडी येथून कांदा भरण्यासाठी हिवरा येथे जात असताना कड्याजवळ येताच पिकअपचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात २२ मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान घडली.
आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील दिलीप महाजन गावातील २२ मजुरांना घेऊन पिकअप क्रमांक एम.एच ०१,एल.२६८५ हिवरा येथे जात असताना गुरूवारी सकाळी साडेदहाच्या दरम्यान कड्याजवळील खोल ओढ्यात येताच पिकअपचे समोरील टायर फुटल्याने झालेल्या अपघातात अनेक मजुर गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमींवर कडा, अहिल्यानगर येथील खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.