शहरं
Join us  
Trending Stories
1
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
4
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
5
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
6
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
7
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
8
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
9
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
10
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
11
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
12
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
13
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
14
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
15
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
16
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
17
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
18
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा

एकाच सरणावर सात जणांना अग्निडाग; उपस्थितही गहिवरले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:04 AM

तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झाले होते.

ठळक मुद्देनिवडुंगवाडीत एकही चूल पेटली नाही : दुपारपासूनच नातेवाईकांसह ग्रामस्थांची मुंडेंच्या घरासमोर गर्दी

दीपक नाईकवाडे ।लोकमत न्यूज नेटवर्ककेज : तालुक्यातील निवडुंगवाडी येथील भीमराव व बन्सी मुंडे या दोन भावांवर त्यांच्या कुटुंबातील भाऊ, पत्नी, सून, नातू व पुतण्या व मुलावर थरथत्या हाताने अग्निडाग देण्याची वेळ काळाने आणली. पाटोद्याजवळ सोमवारी झालेल्या अपघातात मुंडे कुटुंबातील सातजण जागीच ठार झाले होते. सायंकाळी निवडूंगवाडी येथे एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नशिबानं थट्टा मांडत आणलेली क्रुर वेळ सहन होत नव्हती. अग्निडाग देताना भीमरावांचे हात थरथरले आणि उपस्थितांमध्ये अश्रुंचा बांध फुटला.निवडुंगवाडी येथील मुंडे कुटुंबीय देवदर्शनासाठी निवडुंगवाडी येथून सोमवारी सकाळी जीप मधून पाटोदा तालुक्यातील देव मोठ्या आनंदाने निघाले होते. घरातून जाऊन एक तासही लोटला नाही तोच त्यांच्या जीपचा अपघात झाला. तासाभराने आठ जण ठार झाल्याची वार्ता निवडुंगवाडीत कळताच ऐकणाऱ्यांनाही धक्का बसला.या अपघातात ठार झालेल्यांमध्ये आई, मुलगा, दीर, भावजयी, नातवासह सून असे एकाच कुटुंबातील सातजण तर एक व्याही अशा आठ जणांचा समावेश होता. संपूर्ण गावात शोककळा सरली होती. दिवसभर गावात एकाच्याही घरी चूल पेटली नव्हती. गावातील महिला, पुरुषांनी मुंडे कुटुंबियांच्या घरी धाव घेत त्यांच्या दु: खात सहभागी झाले होते. देवा असं का केलं... काय चुकलं....सगळंच गेलं.. आता कसं राहयचं म्हणताना घरातील व्यक्तींच्या भावना अनावर झाल्या होत्या. यावेळी येथे उपस्थितांच्या डोळ्यातून निघणारे अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते.नातेवाईकांसह कुटुंबियांचा आक्रोश आवरणारेही झाले स्तब्ध‘फारच वाईट झाले, असे प्रत्येकजण म्हणत होते. मुंडे कुटुंबियांचे सांत्वन करत घराबाहेर डोळ्यात प्राण आणून वाट पाहत होते.अपघात होऊन सात तास झाले होते. सूर्य मावळतीकडे निघाला होता. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दोन जीप व एका रुग्णवाहिकेतून अपघातातील मृतदेह निवडुंगवाडीत आणले.यानंतर मात्र नातेवाईकांसह मुंडे कुटुंबीयांचा आक्रोश आवरणारेही स्तब्ध झाले.गावाजवळील स्मशानभूमीत भीमराव मुंडे यांनी पत्नी, सून,नातींसह भाऊ, भावजयी आणि भावास थरथरत्या हाताने अग्निडाग दिला. यावेळी केज, नेकनूर, नांदूर, डोईफडवाडीसह परिसरातील नातेवाईकांसह शेकडो नागरीक उपस्थित होते.

टॅग्स :BeedबीडAccidentअपघातDeathमृत्यू