शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

उमरी ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात वरिष्ठांचे हात ओले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:45 IST

लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार व अपहारप्रकरणी पंचायत समितीकडे अनेक वेळा तक्रारी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतीत झालेल्या भ्रष्टाचार व अपहारप्रकरणी पंचायत समितीकडे अनेक वेळा तक्रारी व स्मरणपत्र देऊनही कारवाई झाली नाही. यामुळे बीड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. या तक्रारीला पंधरा दिवस होऊनही संबंधितावर कारवाई होत नाही. यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी आता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

माजलगाव तालुक्यातील उमरी ग्रामपंचायतीमध्ये मागील अनेक वर्षांत तत्कालीन ग्रामसेवकाने नियमित मासिक बैठका न घेता व अनुपस्थितीत असलेल्या ग्रामपंचायत सदस्यांच्या बोगस स्वाक्षऱ्या करून अनेक ठराव घेतले होते. गावात काहीच कामे न करता, लाखोंचा निधी खर्च केल्याचे दाखविले आहे.

याबाबत पाच ग्रामपंचायत सदस्यांनी एक वर्षापासून पंचायतीकडे तक्रारी, स्मरणपत्र देऊनही संबंधितावर कारवाई झाली नाही. विस्तार अधिकारी रामचंद्र रोडेवाड यांनी ग्रामपंचायतीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करूनही वरिष्ठांना अद्याप अहवाल वरिष्ठांकडे सादरच केला नाही. त्यांना विचारायला गेले की, ते टाळाटाळ करताना दिसत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे. याबाबत ३१ मे रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे या सदस्यांनी तक्रार केली होती. या तक्रारीला पंधरा दिवस उलटून गेले आहेत. आता या ग्रामपंचायत भ्रष्टाचार प्रकरणात वरिष्ठांचेच हात ओले झाले असल्याचा आरोप त्या सदस्यांनी केला आहे.

....

चार दिवसांत ग्रामसेवक, सरपंचांवर तत्काळ कारवाई न झाल्यास, औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा ग्रामपंचायत सदस्य अविनाश दीक्षित, वैजनाथ घायतिडक, छाया दीक्षित, सुरेखा इनामकर, मंजेश शिंदे यांनी दिला आहे.

------

कर्तव्यदक्षतेवर प्रश्नचिन्ह

पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी प्रज्ञा माने यांनी चौकशी केल्यानंतर, त्या तत्काळ कारवाई करतील, अशी अपेक्षा असतानाही त्यांनी काहीच कारवाई केली नाही, परंतु भ्रष्टाचार करणाऱ्यांना व त्यांची चौकशी करून अहवाल देण्यास टाळाटाळ करणाऱ्या विस्तार अधिकाऱ्यांना पाठीशी घालण्याचे काम केले असल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्य तुकाराम इनामकर यांनी केला आहे.

-----

दोन दिवसांपूर्वी पत्र पाठविले आहे. चौकशी करून कारवाई करू. एक वर्षापासून तक्रारी, स्मरणपत्र देऊनही काहीच कारवाई न करणाऱ्या व कामात दिरंगाई करणाऱ्यांवरही कारवाई करू. यावर दोन दिवसांत निर्णय घेऊ.

- दत्तात्रय गिरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड.

......

उमरी ग्रामपंचायतीत भ्रष्टाचार व निधी अपहाराबाबत जबाबदार असणाऱ्या व्यक्तींविरोधात एक वर्षापासून तक्रारी करूनही ठोस कारवाई नाही. कारवाईसंदर्भात दिरंगाई करणाऱ्या किंवा निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. याबाबत आम्ही आयुक्तांची दारे ठोठावणार आहोत.

- वैजनाथ घायतिडक, ग्रामपंचायत सदस्य, उमरी.

....