महानंदच्या संचालकपदी भाजप जेष्ठ नेते फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 18:44 IST2022-12-30T18:43:34+5:302022-12-30T18:44:13+5:30
सर्वसाधारण मतदारसंघातून संचालकपदी झाली बिनविरोध निवड

महानंदच्या संचालकपदी भाजप जेष्ठ नेते फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड
परळी ( बीड) : महानंद अर्थात महाराष्ट्र राज्य सहकारी दूध महासंघ मर्यादित, मुंबई संचालकपदी येथील भाजपाचे ज्येष्ठ नेते, भगवान सेनेचे सरसेनापती फुलचंद कराड यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचा शहरात नाथनगर येथील निवासस्थानी गुरुवारी सायंकाळी लिंबुटा ग्रामस्थांच्यावतीने स्वागत करण्यात आले.
परळी तालुका दूध उत्पादक व्यावसायिक सहकारी संघ मर्यादितचे चेअरमन तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते फुलचंद कराड यांची महाराष्ट्र राज्य महासंघ (महानंद) दूध डेअरीच्या सर्वसाधारण मतदारसंघातून संचालकपदी बिनविरोध निवड झाली आहे. त्याबद्दल येथे त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी लिंबोटा गावचे सुधाकर बनसोडे, अरुण मुंडे, जय राम मुंडे, विश्वनाथ मुंडे, मनोज मुंडे, देविदास कराड, राजाभाऊ मुंडे बाळासाहेब कराड रोहन मुंडे यांच्यासह इतर ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. दरम्यान, आज सायंकाळी ५ वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्यांची आतिषबाजी करत, ५१ तोफा वाजवून कार्यकर्त्यांनी कराड यांच्या निवडीबद्दल आनंद व्यक्त केला.
राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देऊ
राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत. सोबतच शेतकऱ्यांच्या दुधाला राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देण्यावरी ही आपला भर असल्याचे फुलचंद कराड यांनी सांगितले.