शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

चोरीच्या दुचाकी विकून पुणे, मुंबईत दोघे करायचे ‘ऐश’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 00:27 IST

बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड, लातूर जिल्ह्यातून दुचाकी चोरून त्या पुण्यात नेवून विक्री करायच्या. मिळालेल्या पैशांवर मग पुणे, मुंबईमध्ये जाऊन ऐश करायची. मागील दोन महिन्यांपासून सुरू असलेला हा खेळ पोलिसांनी बंद पाडला आहे. दोन अट्टल दुचाकी चोरांच्या मुसक्या आवळत त्यांच्याकडून तब्बल २० दुचाकी जप्त केल्या आहेत. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस अधीक्षक जी.श्रीधर यांच्या विशेष पथकाने संयुक्तरीत्या केली.सुशांत रामनाथ मुंडे (२१, रा. साळींबा, ता. वडवणी) व महेश (अल्पवयीन असल्याने नाव बदलले) अशी पकडलेल्या दुचाकी चोरांची नावे आहेत. टोळीचा म्होरक्या व अन्य एकजण अद्यापही फरार आहे. गत दोन महिन्यांपासून त्यांनी बीड जिल्ह्यात धुमाकूळ घातला होता.दिवसेंदिवस दुचाकी चोरीच्या घटना वाढत असल्याने स्थानिक गुन्हे शाखेने तपास गतीने सुरू केला. पो. नि. घनश्याम पाळवदे यांना हे चोरटे केज तालुक्यात असल्याचे समजले. त्यांनी सपोनि अमोल धस आणि पोउपनि आर. ए. सागडे यांना आदेश देत तपासाला पाठविले. त्यांनीही दोन चोरट्यांना केज-धारूर रोडवर पाठलाग करून ताब्यात घेतले. त्यांना अंबाजोगाई शहर पोलिसांच्या स्वाधीन करणार असून, जवळपास ७ लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून हस्तगत केल्याचे सूत्रांनी सांगितले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, अजित बोºहाडे, एलसीबीचे पोलीस निरीक्षक घनश्याम पाळवदे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि अमोल धस, विशेष पथकाचे प्रमुख पोउपनि आर. ए. सागडे, सहायक पोलीस निरीक्षक अमोल धस, गलधर, बालाजी दराडे, गणेश दुधाळ, सखाराम पवार, साजीद पठाण, राजू वंजारे, हराळ, पांडुरंग देवकते, गणेश नवले, अंकुश वरपे, रेवणनाथ दुधाने, जयराम उबे आदींनी केली आहे.१५ गुन्हे उघडपुणे, हडपसर, स्वारगेटसह बीड जिल्ह्यातील सिरसाळा, अंबाजोगाई शहर, धारूर, परळी शहर, परळी ग्रामीण, वडवणी व लातूर जिल्ह्यातील जवळपास १५ गुन्हे उघडकीस आले आहेत. अद्यापही पोलिसांकडून दुचाकींचा शोध घेतला जात आहे. आणखी गुन्हे उघड येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शिक्षण नको, मौज पाहिजे..सुशांत व महेश यांना शिक्षणाची आवड नाही. घरची परिस्थिती चांगली असतानाही त्यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले. वाईट मित्रांच्या संगतीने ते गुन्हेगारीकडे वळले. मौजमस्ती करायला पैसे कमी पडल्याने त्यांनी दुचाकी चोरीचा मार्ग निवडला. सुरूवातीला ते यशस्वी झाले. मात्र पोलिसांच्या तावडीतून ते वाचू शकले नाहीत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeed policeबीड पोलीसbikeबाईक