महाराष्ट्र केसरीसाठी बेलगावच्या राहुल पोकळेची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST2021-04-02T04:34:44+5:302021-04-02T04:34:44+5:30
आष्टी : नुकत्याच आहेरचिंचोली येथे बीड जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील बेलगावचे पैलवान अरुण ...

महाराष्ट्र केसरीसाठी बेलगावच्या राहुल पोकळेची निवड
आष्टी : नुकत्याच आहेरचिंचोली येथे बीड जिल्हा महाराष्ट्र केसरी चाचणी स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये आष्टी तालुक्यातील बेलगावचे पैलवान अरुण वस्ताद पोकळे यांचे चिरंजीव पैलवान राहुल पोकळे याची ८६ किलो वजनी गटामधून निवड झाली आहे. या निवडीबद्दल चिंचाळा राघापूरचे सरपंच अशोक पोकळे यांच्याकडून ११ हजार १७३ रुपयाचे प्रोत्साहनपर बक्षीस देऊन राहुलचा व त्याच्या वडिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बेलगावचे सरपंच रामकिसन पोकळे ,चिंचाळा राघापूरचे सरपंच अशोक अण्णा पोकळे, माजी सरपंच बन्सी भाऊ पोकळे, ॲड. अजिनाथ पोकळे ,माजी सरपंच अण्णा पोकळे, पत्रकार शरद तळेकर, माजी उपसरपंच संजय पोकळे, हनुमंत पोकळे सर, अण्णासाहेब वांढरे ,ज्ञानेश्वर पोकळे, गणेश पोकळे, संतोष गोल्हार, बाळू पोकळे, ज्ञानू पोकळे, अमोल पोकळे, बाळासाहेब पोकळे, संतोष गोल्हार, राजू खंडागळे, संदीप पोकळे, हनु पोकळे, अण्णासाहेब वडेकर, भरत पैलवान इत्यादी उपस्थित होते.
युवकांनी मातीतील खेळांकडे वळावे
आष्टी तालुक्यातील युवकांनी आजपर्यंत देश राज्य पातळीवर नाव गाजवले आहे. त्याच पद्धतीने युवकांनी यापुढे देखील माती संलग्न खेळांमध्ये आपलं भविष्य घडवण्यासाठी पुढे यावे. कोणतीही अडचण आल्यास आमच्याशी संपर्क साधावा आम्ही नक्कीच प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न करत राहू. मोबाईलच्या युगामध्ये भरकटत चाललेल्या युवकांनी मातीतील खेळांकडे वळावे.
- अशोक पोकळे, सरपंच, चिंचाळा, राघापूर
युवकांना गाव पातळीवरून प्रोत्साहन मिळणे महत्त्वाचे
क्षेत्र कोणतेही असो परंतु गावपातळीवरून जर युवकांना प्रोत्साहन मिळाले तर युवक नक्कीच चांगली कामगिरी करून आपल्या गावाचे नाव तालुक्याचे नाव जिल्ह्याचे नाव उंचावल्याशिवाय राहणार नाही. मला मिळालेल्या संधीचे मी नक्कीच सोने करी आणि माझ्या गावकऱ्यांनी सहकाऱ्यांनी वडीलधाऱ्यांनी दिलेल्या प्रोत्साहनाचे फळ त्यांना माझ्या कामगिरीतून देईल
- पै. राहुल अरुण पोकळे, बेलगाव
===Photopath===
010421\01bed_5_01042021_14.jpg