शहरं
Join us  
Trending Stories
1
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
2
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
3
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
4
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
5
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
6
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
7
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
8
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
9
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
10
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
11
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
12
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
13
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
14
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
15
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
16
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
17
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
18
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
19
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
20
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा

शाळेत दारूच्या बाटल्यांसह कंडोमचा दोन पोती कचरा आढळल्याने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 12:00 PM

तळीरामांच्या बंदोबस्तासाठी पोलिसांची मदत घेणार

ठळक मुद्देजिल्हा परिषद मुलींच्या शाळेतील प्रकार टारगट मुलांचा वा तळीरामांचा उपद्रव

अंबाजोगाई (जि. बीङ) : येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळा परिसरात सोमवारी दोन पोती दारूच्या बाटल्या आणि कंडोमचा कचरा आढळल्याने खळबळ उडाली आहे. टारगट मुलांनी वा तळीरामांनी हा उपद्रव केला असावा, अशी शक्यता मुख्याध्यापकांनी वर्तविली. यांचा बंदोबस्त करण्यासाठी आता पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.  

४५ दिवसांच्या उन्हाळी सुट्यानंतर १७ जून रोजी शैक्षणिक वर्षाला प्रारंभ झाला. येथील मंडी बाजार भागात असलेल्या जिल्हा परिषद मुलींच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत वर्ग असून जवळपास ३५० पटसंख्या आहे. सोमवारी पहिल्याच दिवशी शिक्षकांनी परिसरात स्वच्छता केली असता त्यांना दारूच्या बाटल्यांचा खच आणि कंडोमचा कचरा दिसून आला. हा कचरा उचलून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. शाळेच्या परिसरात अशा प्रकारचा कचरा आढळून आल्याने आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. शाळेला सुरक्षा भिंत आहे. मात्र तिची उंची कमी असल्याने त्यावर चढून किंवा बाहेरून परिसरात हा कचरा फेकला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.  या शाळेजवळच भाजीमंडई व इतर गजबजलेला परिसर आहे. हा बाजार परिसर रात्री मोकळा असतो.

पोलीस प्रशासनांची मदत घेणार शाळा व परिसराची वारंवार स्वच्छता केली जाते. यापुढेही काळजी घेतली जाईल. शाळेजवळच्या परिसरातील टारगट मुलांचा सातत्याने उपद्रव असतो. सुटीमुळे शाळा परिसरात कोणी नसल्याने टारगट व तळीरामांनी हा प्रकार केला असावा. अशा लोकांचा उपद्रव टाळण्यासाठी त्यांचा बंदोबस्त करावा म्हणून आता पोलीस प्रशासनाची मदत घेणार आहे. - हनुमंत जयवंत कदम, मुख्याध्यापक 

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळाTeacherशिक्षकStudentविद्यार्थीGarbage Disposal Issueकचरा प्रश्नAmbajogaiअंबाजोगाई