आष्टीत गळफास घेऊन दहीविच्या मुलीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 18:45 IST2019-05-17T18:41:23+5:302019-05-17T18:45:17+5:30

घरात कोणी नसताना मुलीने केली आत्महत्या

School girl commits suicide in Aashti | आष्टीत गळफास घेऊन दहीविच्या मुलीची आत्महत्या

आष्टीत गळफास घेऊन दहीविच्या मुलीची आत्महत्या

कडा (बीड ) : घरात कोणी नसताना एका शाळकरी मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी खिळद येथे घडली. आरती आजिनाथ गर्जे (१६ ) असे मृत मुलीचे नाव असून आत्महत्येचे कारण अद्याप कळले नाही. 

तालुक्यातील खिळद येथील आजिनाथ गर्जे हे पनवेल येथे चालक म्हणून काम करतात. खिळद येथे त्यांची पत्नी तीन बहिणी राहतात. आरती या मोठ्या मुलीने नुकतीच दहावीची परीक्षा दिली आहे. आज दुपारी आरतीची आई रुग्णालयात गेली होती तर दोघी बहिणी बाहेर खेळत होत्या. या दरम्यान आरतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच अंभोरा पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. 

Web Title: School girl commits suicide in Aashti