‘मुंडे पालकमंत्री असताना ७३ काेटींचा घाेटाळा’; सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 07:01 IST2025-01-30T07:01:31+5:302025-01-30T07:01:59+5:30

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत काडीचेही काम न करता एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Scam worth Rs 73 crore when Munde was the Guardian Minister bjp mla suresh dhas alligations | ‘मुंडे पालकमंत्री असताना ७३ काेटींचा घाेटाळा’; सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप 

‘मुंडे पालकमंत्री असताना ७३ काेटींचा घाेटाळा’; सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप 

लोकमत न्यूज नेटवर्क, बीड : धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना अंबाजोगाई सार्वजनिक बांधकाम विभागातर्गंत काडीचेही काम न करता एकूण ७३ कोटी ३६ लाख रुपयांची बोगस बिले उचलली गेली. २०२१ ते २०२३ या काळात हा गैरप्रकार घडल्याचा आरोप भाजप आमदार सुरेश धस यांनी बुधवारी केला.

३० डिसेंबर २०२१ रोजी  २ कोटी २१ लाख, १० कोटी ९८ लाख, २५ मार्च २०२२ रोजी कार्यकारी अभियंता अंबाजोगाई येथील ६ कोटी ५८ लाख, ३१ मार्च २०२२ रोजी बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता बीड यांच्याकडून १ कोटी ३२ लाख रुपये बिलापोटी उचलण्यात आले. परळीतील संजय मुंडे हे उपअभियंता असताना, त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता पदभार दाखवून २५ जून २०२२ रोजी एकाच दिवशी ३७ कोटी ७० लाख रुपये उचलण्यात आले. 

रद्द केलेल्या कामांचेही 
१४ कोटी रुपये उचलले
२५ मार्च २०२० रोजी जिल्हा नियोजन समिती अंतर्गत असलेल्या ५७ कामांच्या प्रशासकीय मान्यता तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या होत्या. परंतु अंबाजोगाई बांधकाम विभागांतर्गत असलेल्या या रद्द कामांची १४ कोटी ४३ लाखांची बिले उचलण्यात आली, असा आरोपही आ. धस यांनी पत्रकार परिषदेत केला. 

सुरेश धस यांचा सनसनाटी आरोप 
सार्वजनिक बांधकाम विभाग अंबाजोगाई अंतर्गत रस्ते विशेष दुरुस्ती कार्यक्रम २०२१-२२ साठी ९ कामांसाठी १५ कोटी, १८ फेब्रुवारी २०२२ रोजी १ कोटी २० लाख व १६ कोटी २० लाख रुपये काम न करता उचलले.  अर्थसंकल्पीय हॅम अर्थात हायब्रीड अन्युटी अंतर्गत ६९ कोटी रुपयांचे रस्ता काम सुरू असताना, ६ कोटी रुपये मंजूर करून आणले. तसेच, परळी पूस-बर्दापूर कामासाठी ५ कोटी रुपये उचलले.  या कामांची क्षेत्रीय कार्यालयाने पाहणी केली असता या कामांवर डबल पैसे उचलल्याचे लक्षात आले. ही बाब क्षेत्रीय कार्यालयाने कळवली असताना सुद्धा कोणतीच कारवाई झाली नाही, असेही धस म्हणाले.

Web Title: Scam worth Rs 73 crore when Munde was the Guardian Minister bjp mla suresh dhas alligations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.