शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
8
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
9
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
10
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
11
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
12
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
13
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
14
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
15
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
16
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
17
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
18
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
19
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल
20
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!

"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2025 17:04 IST

"संतोष देशमुखांच्या पाणी क्रांतीला राष्ट्रीय मान्यता"; मस्साजोगच्या सरपंचांना दिल्लीतील ध्वजारोहणाचे निमंत्रण 

- मधुकर सिरसट केज ( बीड) : स्वातंत्र्य दिनानिमित्त दिल्ली येथे होणाऱ्या ध्वजारोहण सोहळ्यास उपस्थितीत राहण्यासाठी केज तालुक्यातील मस्साजोग येथील महिला सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे या दोघांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निमंत्रित केले आहे. बीडचे जिल्हाधिकाऱ्यांनी हे निमंत्रण खास दुताकरवी सोनवणे यांच्याकडे सुपूर्द केला असून महाराष्ट्रातील त्या एकमेव सरपंच ठरल्या आहेत. याप्रकारे मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत केलेल्या पाणीदार शिवाराची दखल राष्ट्रीय पातळीवर होत असल्याने ग्रामस्थांनी जोरदार स्वागत केले आहे.

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची  दि. 9 डिसेंबर 2024 रोजी हत्या झाल्यानंतर उपसरपंच असलेल्या वर्षा आनंदराव सोनवणे यांची 1 जानेवारी 2025 रोजी सरपंच पदी वर्णी लागली होती. मस्साजोग येथील सरपंच स्वर्गीय संतोष देशमुख यांनी त्यांच्या कारकिर्दीत नाम फाउंडेशन व पाणी फाउंडेशन यांच्या वतीने दि. 5 मे 2024 पासून मस्साजोग परिसरातील नदी खोली करण, तलावातील गाळ उपसा करुन तलावाचे ही खोलीकरण केले होते. दरम्यान पंधरा दिवसानंतरच अवकाळी पाऊस आल्यामुळे नदीच्या पात्रात व तलावातील पाण्याची पातळी वाढली. यामुळे मस्साजोग शिवारातील बोअर व विहिरीतील पाणी पातळी वाढत सारा शिवार पाणीदार झाला होता. याची दखल जिल्हाधिकारी यांनी घेवून याचा अहवाल दिल्ली येथील जसलशक्ती मंत्रालयाला पाठवला. 

गावासाठी केलेल्या या कामाची दखल स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली असून मस्साजोगच्या सरपंच वर्षा सोनवणे यांच्यासह त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे यांना स्वातंत्र्यदिनी दिल्ली येथे होणाऱ्या स्वातंत्र्यदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. सरपंच वर्षा सोनवणे व त्यांचे यजमान आनंदराव सोनवणे हे बुधवारी सकाळीच दिल्लीकडे रवाना झाले आहेत.

महाराष्ट्रातून एकमेव सरपंच...नाम व पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून शिवारातील नदी खोलीकरण व तलावातील गाळ काढून केलेल्या तलावाच्या खोलीकरणामुळे सारा शिवार पाणीदार झाल्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आहे. महाराष्ट्रातून मस्साजोगच्या एकमेव सरपंच वर्षा सोनवणे यांना हा बहुमान मिळणार आहे. सोनवणे दांपत्याची दिल्ली येथील जलशक्ती मंत्रालयाच्या केंद्रीय माती आणि पदार्थ संशोधन केंद्राच्या सदनात (सीएसएमआरएस) थांबण्याची व्यवस्था केल्याची माहिती तेथील संपर्क अधिकारी रजत जांगिड यांनी लोकमतशी बोलताना दिली.

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणIndependence Dayस्वातंत्र्य दिनsarpanchसरपंचBeedबीड