शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

तरुणीचा फोटो, मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा स्क्रीनशॉट; ग्रुपमध्ये कोण-कोण, नावे आली समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 17:19 IST

Santosh Deshmukh Mokarpanti whatsapp Group: सीआयडीने जे आरोपपत्र दाखल केले आहे, त्यात मोकारपंती ग्रुपची बरीच माहिती देण्यात आली आहे. कोणते लोक त्या ग्रुपमध्ये आहेत, त्यांची नावेही देण्यात आली आहे. 

Santosh Deshmukh Krushna Andhale News: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना काही व्हिडीओ कॉल एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर केले गेले होते. चार वेळा व्हिडीओ कॉल करून संतोष देशमुख यांची मारहाण करून कशी अवस्था केली आहे, याची माहिती ग्रुपमधील इतर लोकांना दिली गेली होती. मोकारपंती असे त्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचे नाव असून, आरोपपत्रात त्याचा स्क्रीनशॉटही जोडला गेला आहे. या ग्रुपचा डीपी (डिस्प्ले फोटो) एका तरुणीचा फोटो ठेवण्यात आलेला आहे. त्याचबरोबर या ग्रुपमध्ये कोण कोण सदस्य आहेत? हत्या झाली त्यावेळी कधी कधी व्हिडीओ कॉल केले गेले याची माहितीही आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.

 'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एकूण १४ सदस्य आहेत. या ग्रुपचा अ‍ॅडमिन स्वतः कृष्णा आंधळे आहे. जयराम चाटे हाही या ग्रुपमध्ये होता. पण, ज्यावेळी संतोष देशमुख यांना मारहाण केली जात होती. त्यावेळी चार व्हिडीओ कॉल केले गेले. ते सर्व कॉल कृष्णा आंधळेने केले होते. 

कृष्णा आंधळेने कधी कधी केले व्हिडीओ कॉल?

संतोष देशमुख यांचे अपहरण केल्यानंतर त्यांना मारहाण करण्यात आली. ३.३० वाजता त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पहिला कॉल ५ वाजून १४ मिनिटांनी करण्यात आला, जो ४४ सेकंदांचा होता.

दुसरा व्हिडीओ कॉल ५ वाजून १६ मिनिटांनी करण्यात आला, जो ४५ सेकंदांचा होता. तिसरा व्हिडीओ कॉल ५ वाजून १९ मिनिटांनी करण्यात आला. या कॉलचा कालावधी २ मिनिटं ३ सेकंद होता. तर चौथा कॉल ५ वाजून २६ मिनिटांनी करण्यात आला होता. जो २ मिनिटे आणि ४४ सेकंदांचा होता. 

डीपीवर तरुणीचा फोटो?

आरोपपत्रात असा उल्लेख करण्यात आला आहे की, मोकारपंती व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपचा डीपी टू पीस कपडे परिधान केलेली एक तरुणीचा आहे. महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतिक घुले यांच्यासह १४ जण या ग्रुपचे सदस्य आहेत. या ग्रुपवर ज्यावेळी कॉल केले गेले, त्यावेळी वाल्मीक कराडही ते बघत होता, असा दावा आधीच आमदार सुरेश धस यांनी केला आहे. 

कृष्णा आंधळे म्हणाला, हाच तो सरपंच

कृष्णा आंधळेंने मोकारपंती ग्रुपवर व्हिडीओ कॉल केला. बेदम मारहाणीमुळे जखमी झालेल्या संतोष देशमुख यांच्याजवळ त्याने कॅमेरा नेला. तीन वेळा त्यांच्या चेहऱ्याजवळ कॅमेरा नेला आणि ग्रुपमधील लोकांना दाखवला. 

"हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे, जो त्या दिवशी सुदर्शन भय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता", असे कृष्णा आंधळे म्हणाला. ही माहिती ग्रुपचा सदस्य असलेल्या दत्ता मैंद याने सीआयडीला दिलेल्या जबाबात म्हटले आहे. 

हे बघून ग्रुपमधील गणेश बसवर याने मारू नका असं सांगितले. तो कृष्णा आंधळेला म्हणाला, "वाघ्या, लाई मारला आहे. आता बास करा, त्या सरपंचाला मारायचे." असा संवाद त्या व्हिडीओ कॉलवेळी झाल्याचे आरोपपत्रात म्हटलेले आहे. 

एका व्हिडीओ कॉलमध्ये संतोष देशमुख हे काळ्या स्कॉर्पिओ गाडीत जखमी अवस्थेत पडून आअसल्याचे दिसत आहे. जखमा झाल्याने ते रक्तबंबाळ झालेले आहेत. त्याची पाठ काळी-निळी पडल्याचेही दिसत आहे. 

टॅग्स :Santosh Deshmukhसंतोष देशमुख हत्या प्रकरणbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणwalmik karadवाल्मीक कराडWhatsAppव्हॉट्सअ‍ॅपCrime Newsगुन्हेगारी