गेवराईत आज संघर्ष मोर्चाच्या बैठकीचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:25 IST2021-06-01T04:25:00+5:302021-06-01T04:25:00+5:30

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बीड येथून मोर्चा काढण्यासाठी संपूर्ण बीड ...

Sangharsh Morcha meeting held in Gevrai today | गेवराईत आज संघर्ष मोर्चाच्या बैठकीचे आयोजन

गेवराईत आज संघर्ष मोर्चाच्या बैठकीचे आयोजन

मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी शिवसंग्रामचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत बीड येथून मोर्चा काढण्यासाठी संपूर्ण बीड जिल्ह्यात सध्या त्यांच्या उपस्थितीत नियोजनाच्या बैठका सुरु आहेत. महाराष्ट्र राज्यात मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची सुरवात बीड येथून करणार असल्याचा निर्णय आमदार विनायक मेटे यांनी घेतला आहे. त्या अनुषंगाने तालुक्यात देखील या मोर्चासाठी जय्यत तयारी शिवसंग्रामचे तालुकाध्यक्ष कैलास माने यांनी सुरु केली आहे.

याचा आढावा, मोर्चाची पुढील तयारी व दिशा काय याबाबत आमदार विनायक मेटे यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी १०.३० वाजता महात्मा फुले सिटी सेंटर येथे ही बैठक होत आहे. यावेळी नरेंद्र पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. तालुक्यातील मराठा समाज बांधवांनी पक्ष विरहीत समाज बांधव म्हणून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन शिवसंग्रामचे गेवराई तालुकाध्यक्ष कैलास माने, डाॅ. भागवत निकम, संजय काळे, महेश दाभाडे, शाम येवले, दुर्रेश यादव, ॲड.सुभाष निकम, माउली नवले, संतोष जाधव, कैलास तळेकर, संग्राम गंगाधर, बाबा खरात आदींनी केले आहे.

Web Title: Sangharsh Morcha meeting held in Gevrai today