वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2018 23:37 IST2018-01-31T23:19:18+5:302018-01-31T23:37:39+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क गेवराई : तालुक्यातील रेवकी गावाकडे जात असताना अवैध वाळूवाहतूक करणाºया ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये एक ...

वाळूच्या ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास चिरडले
लोकमत न्यूज नेटवर्क
गेवराई : तालुक्यातील रेवकी गावाकडे जात असताना अवैध वाळूवाहतूक करणाºया ट्रॅक्टरने दुचाकीस्वारास धडक दिली. यामध्ये एक जण जागीच ठार झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी रात्री घडली. या घटनेनंतर नातेवाईक, ग्रामस्थ आक्रमक झाले होते. ट्रॅक्टर चालकावर गुन्हा दाखल करून अवैध वाळू उपसा व वाहतूक बंद करावी, यामागणीसाठी उपजिल्हा रुग्णालयासमोर एक तास रास्ता रोको आंदोलन केले. यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
अजिनाथ बाबूराव बाबरे (४५ रा.रेवकी) असे अपघातात ठार झालेल्यांचे नाव असून अशोक थोरात हे गंभीर जखमी आहेत. हे दोघेही दुचाकीवरून (एमएच २३ एव्ही ५८०४) गावाकडे जात होते. तलवाडा रोडवरील रेवकी फाटा येथे समोरून येणाºया अवैध वाळू वाहतूक करणाºया ट्रॅक्टरने त्यांना जोराची धडक दिली. यामध्ये अजिनाथ बाबरे हे ट्रॅक्टरखाली गेल्याने जागीच ठार झाले तर थोरात गंभीर जखमी झाले.
दरम्यान, ट्रॅक्टरचालकावर गुन्हा दाखल करून तालुक्यात होत असलेला अवैध वाळू उपसा बंद करावा, या मागणीसाठी ग्रामस्थांनी उपजिल्हा रूग्णालयासमोरच ठिय्या मांडला. ऐन रस्त्यावर ठिय्या मांडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने याठिकाणी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घटनेची माहिती मिळताच जि.प.सदस्य विजयसिंह पंडित, अभिजित पंडित यांनी आंदोलनाकडे धाव घेतली. ग्रामस्थांना अश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.