: येथील कोविड केअर सेंटर चालू करण्यासाठी आदेश आले असून ४० बेडला मंजुरी मिळाली आहे. शुक्रवारी सेंटर सुरू होणार असल्याचे धारूर ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले. मागील वर्षी धारूर येथील कोविड केअर सेंटर हे जिल्ह्यामध्ये नियोजनाबाबत सर्वोत्कृष्ट सेंटर म्हणून नावाजले होते. मागील पंधरा ते वीस दिवसात धारूर शहरांमध्ये व तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथील कोविड सेंटर पुन्हा सुरू करावे, अशी मागणी सामाजिक संघटना व नागरिकांतून होत होती. अखेर या सेंटरला परवानगी मिळाली असून ४० खाटांचे सेंटर २ एप्रिलपासून या ठिकाणी सुरू करण्यात येणार असल्याचे ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले.
धारूरमध्ये ४० खाटांच्या कोविड केअर सेंटरला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:34 IST