आरटीई मोफत प्रवेशाची वेबसाईट हँग ! पालक ताटकळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:52+5:302021-03-14T04:29:52+5:30
राज्य शिक्षण विभागांतर्गत मोफत शिक्षण कायद्याच्या अधीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ३ ...

आरटीई मोफत प्रवेशाची वेबसाईट हँग ! पालक ताटकळले
राज्य शिक्षण विभागांतर्गत मोफत शिक्षण कायद्याच्या अधीन आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून इंग्रजी शाळेत प्रवेशासाठी ३ मार्च २०२१ ते २१ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाइन अर्ज मागवले आहेत. आपल्या पाल्याच्या प्रवेश अर्जासाठी पालक ऑनलाइन सेंटरवर गर्दी करीत आहेत. ही वेबसाईट सुरळीत चालत नसल्याने पालकांना ताटकळावे लागत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होणे योग्य नसल्याने वेबसाईट तत्काळ सुरळीत करावी. गेल्या आठ दिवसांपासून पोर्टल चालत नसल्याने पालक हवालदिल झाले आहेत. तर दुसरीकडे सेवा केंद्रचालक बेजार झाले आहेत. पोर्टलवर तांत्रिक अडचणींची सूचना येत असून, लवकरच सुरळीत करण्याचे आश्वासन दिले जात आहे; मात्र आठ दिवस होऊनही अडचण दूर झाली नाही. शिक्षण विभागाने तत्काळ कार्यवाही करून वेबसाईट सुरळीत करावी, नसता पालकांना आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असे फयाज शेख यांनी म्हटले आहे.