बीडमध्ये साडे आठ लाख रूपयांची रोकड जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2019 16:48 IST2019-03-29T16:47:44+5:302019-03-29T16:48:51+5:30
ही रक्कम पंचासमक्ष सील करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे.

बीडमध्ये साडे आठ लाख रूपयांची रोकड जप्त
बीड : वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये तब्बल साडे आठ लाख रूपयांची रोकड आढळली. ही रक्कम जप्त करून निवडणुक विभागाच्या आचारसंहिता पथकाकडे सुपूर्द करण्यात आली आहे. ही कारवाई बीडच्या वाहतूक शाखेने नगर रोडवर राजुरी फाट्यानजीक शुक्रवारी सकाळी केली.
वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक राजीव तळेकर यांच्या आदेशानुसार नगर रोडवर वाहन तपासणी केली जात होती. याचवेळी एक संशयास्पद कार (जीजे ०३ एफडी ८८०७) भरधाव वेगाने येताना दिसली. पोलिसांनी ही कार अडविली. तपासणी केली असता डिक्कीतील एका सुटकेसमध्ये रोख रक्कम असल्याचे दिसले. तात्काळ आचारसंहिता पथकाला माहिती देऊन कार सह पोलीस बीड ग्रामीण ठाण्यात पोहचले. आचारसंहिता पथकाचे प्रमुख तथा बीड पालिका प्र.मुख्याधिकारी मिलींद सावंत हे ठाण्यात आले. येथे इन कॅमेरा रकमेची मोजणी केली असता साडे आठ लाख रूपय असल्याचे समोर आले. ही रक्कम पंचासमक्ष सील करून निवडणूक विभागाकडे सुपूर्द केली जाणार आहे.
दरम्यान, कारमधील भावेश मोहन रामोलिया (३६) व हरेश वजु घाडिया (३२ दोघेही रा.राजकोट, गुजरात) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक विजय कबाडे, पोनि राजीव तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोह आर.डी.नागरगोजे, भारत जावळे, महादेव पवा, महेश खाडे, सफौ. धनराज सोडगीर यांनी केली.