महसूल पथकाच्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणारी दोन वाहने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 14:52 IST2019-09-05T14:51:29+5:302019-09-05T14:52:53+5:30
कारवाईत तब्बल 62 लाखाचा मुद्देमाल जप्त

महसूल पथकाच्या कारवाईत अवैध वाळू उपसा करणारी दोन वाहने जप्त
गेवराई (बीड ) : महसुल विभागाच्या पथकाने बुधवारी मध्यरात्री तालुक्यातील बेलगाव शिवारात अवैध वाळू उपस्यावर कारवाई केली. पथकाने एक हायवा व एक जेसीबी अशी दोन वाहने जप्त केली. कारवाईत तब्बल 62 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
तहसिलदार संगिता चव्हाण यांचे पथक बुधवारी मध्यरात्री तालुक्यातील बेलगाव शिवारात गस्तीवर होते. मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास शिवारात एक जेसीबी व एक हायवा अवैधरीत्या वाळू उपसा करताना आढळून आले. पथकाने लागलीच कारवाई करत दोन्ही वाहने जप्त केली. यानंतर दोन्ही वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आली. या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. या पथकात तहसिलदार संगिता चव्हाण, मंडळ अधिकारी सुनिल तांबारे, गजानन देशमुख, कमलेश सुरवार, अमोल कोढंरे, पि.एस वाठोरे आदींचा समावेश होता.