महिला महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे विमोचन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:27 IST2021-01-13T05:27:32+5:302021-01-13T05:27:32+5:30
महाविद्यालयात ३ ते ९ जानेवारीदरम्यान सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहांतर्गत विद्यार्थिनी व समाजातील युवक-युवतींमध्ये सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची ...

महिला महाविद्यालयात भित्तीपत्रकाचे विमोचन
महाविद्यालयात ३ ते ९ जानेवारीदरम्यान सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या सप्ताहांतर्गत विद्यार्थिनी व समाजातील युवक-युवतींमध्ये सावित्रीबाईंच्या जीवनकार्याची माहिती मिळावी, कार्यातून प्रेरणा मिळावी या उद्देशाने महाविद्यालयातील विविध विभाग व समितीद्वारे विविध स्पर्धा, प्रसंग लेखन, काव्यवाचन ,काव्यलेखन असे उपक्रम राबविण्यात आले. होते. याबाबतची माहिती डॉ रवींद्र ढास यांनी यावेळी दिली.
अध्यक्षीय समारोपप्रसंगी प्राचार्य डॉ. सविता शेटे यांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत महिलांना शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. त्या स्त्रीमुक्तीच्या प्रणेत्या म्हणून ओळखल्या जातात. तत्कालीन परिस्थितीत काही समाजकंटकांनी त्यांच्या अंगावर शेण, माती, दगडं मारली तरीदेखील त्यांनी शिक्षणाचे काम थांबविले नाही. त्यांच्या संघर्षाने अनेक सावित्री शिक्षण घेऊन आज उभ्या राहिल्या आहेत. शिक्षणामुळेच स्त्रियांमध्ये आत्मबल निर्माण होते. जाती-जातीमधील भेद नष्ट होण्यास मदत होते. सावित्रीबाईं या सर्व जाती-धर्मातील मुलींसाठी शाळा सुरू करणाऱ्या, आंतरजातीय विवाहाचे समर्थन करणाऱ्या पहिल्या महिला शिक्षिका होत्या. फुले दाम्पत्याने आपल्या जीवनकार्यात शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले. सावित्रीच्या लेकी घरोघरी ज्योतीबांचा मात्र शोध जारी या उक्तीप्रमाणे प्रत्येकाने आपल्या आयुष्यातील ज्योतिबाचा शोध घ्यावा आणि युवक-युवतींनी त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा जोपासून कार्य करावे असे त्या म्हणाल्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनविशेष समिती प्रमुख सहाय्यक प्रा. डॉ. अर्चना वाघमारे यांनी केले तर प्रा. डॉ. सुनंदा आहेर यांनी मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.