धुलीवंदनानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:35 IST2021-03-27T04:35:29+5:302021-03-27T04:35:29+5:30
बीड : जिल्ह्यात होणाऱ्या कोविड प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि ...

धुलीवंदनानंतर लॉकडाऊनमध्ये शिथिलता
बीड : जिल्ह्यात होणाऱ्या कोविड प्रादुर्भावामुळे लागू केलेल्या संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्यात यावी यासाठी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि शहरातील व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली.यावेळी धुलीवंदनानंतर संचारबंदीच्या कालावधीत शिथिलता देण्याचे आश्वासन त्यांनी दिल्यामुळे व्यापारी, कामगार, मजूर आणि सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे
जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दहा दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. मात्र केवळ दोन तासांचा शिथिल वेळ पुरेसा नसल्याने शुक्रवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर यांच्यासह व्यापारी संघटनेचे दीपक कर्नावट, सूर्यकांत महाजन,अशोक शेटे, जवाहर कांकरिया,प्रकाश कानगावकर यांनी जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांची भेट घेतली. यावेळी शहरातील संचारबंदीच्या शिथील कालावधीत वाढ केल्यास जिल्ह्यातील व्यापाऱ्यांना, दूधविक्रेत्यांना भाजीपाला व फळविक्रेत्यांना दिलासा मिळेल, असे पटवून देण्यात आले. प्रशासनाने नियमानुसार कडक निर्णय घ्यायलाच हवेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून जनतेनेदेखील प्रशासनाला सहकार्य करण्याची गरज आहे. लागू केलेले नियम हे योग्यच आहे मात्र संचारबंदीच्या कालावधीत दोन तास हे पुरेसे नाहीत त्यामुळे व्यापारी आणि नागरिकांच्या दृष्टीने हा कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी नगराध्यक्ष डॉ. क्षीरसागर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. धुलीवंदनानंतर वेळेत शिथिलता देण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी रवींद्र जगताप यांनी दिल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
===Photopath===
260321\262_bed_24_26032021_14.jpeg
===Caption===
शुक्रवारी नगराध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर आणि व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्या सोबत चर्चा केली.