शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

शरद पवार गटात बंडखोरी; धनंजय मुंडेंविरोधात 'हा' नेता अपक्ष निवडणूक लढवणार

By आनंद मोहरीर | Updated: October 28, 2024 18:27 IST

शरद पवार गटातील नेत्याने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

परळी: महाराष्ट्रात सर्वत्र विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यामुळे यंदाची निवडणूक खूप खास बनली आहे. अनेक ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, असा सामना रंगणार आहे. विशेष म्हणजे, या पक्षफुटीमुळे यंदा बंडखोरांची संख्याही वाढली आहे. पक्षाकडून उमेदवारी न मिळालेल्या अनेक इच्छुकांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यामध्ये परळी विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे. येथे शरद पवारांच्या राष्ट्रवादीत बंडखोरी पाहायला मिळत आहे. 

धनंजय मुंडे पवारांच्या टार्गेवरधनंजय मुंडेंनी भाजप सोडल्यानंतर शरद पवारांनीच त्यांना आपल्या पक्षात घेऊन विधान परिषदेवर पाठवले होते. पण, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर मुंडे अजित पवार गटात सामील झाले आणि अनेकवेळा शरद पवार गटावर जहरी टीकाही केली आहे. यामुळे मुंडे सध्या शरद पवारांच्या टार्गेटवर आहेत. धनंजय मुंडेंचा पराभव करण्यासाठी शरद पवारांनी परळीत मराठा कार्ड खेळले आहे. पवारांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष असलेल्या राजेसाहेब देशमुख यांना आपल्या पक्षात घेऊन परळीतून उमेदवारी दिली. पण, आता यामुळेच पक्षात बंडखोरी झाली आहे.

राजेभाऊ फड अपक्ष निवडणूक लढवणारकाही महिन्यांपूर्वीच राष्ट्रीय समाज पक्ष सोडून राष्ट्रवादी काँग्रेस(शप) मध्ये सामील झालेले राजेभाऊ फड परळीतून निवडणूक लढवण्यास इच्छूक होते. त्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून याची तयारीदेखील केली होती. धनंजय मुंडेंचा आपणच पराभव करणार, असा निर्धार राजेभाऊ फड यांनी केला होता. पण, शरद पवारांनी त्यांना डावलून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी जाहीर केली. यामुळे राजेभाऊ फड नाराज झाले आणि त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याची घोषणा केली. तसेच, त्यांनी आज आपला उमेदवारी अर्जही दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी पक्षाला अल्टीमेटम दिला आहे. उद्यापर्यंत परळीचा उमेदवार बदला, अन्यथा मी अपक्ष निवडणूक लढणार, अशी घोषणा त्यांनी आज केली. 

पवारांचे मराठा कार्डपरळी मतदारसंघात मराठा आणि वंजारी समाजाचे निर्णायक मतदान आहे. शिवाय, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाला परळीतूनही मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळाला होता. विशेष म्हणजे, याच जरांगे फॅक्टरमुळे लोकसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला अन् मराठा समाजाचे बजरंग बप्पा सोनवणे विजयी झाले. असाच पाठिंबा विधानसभा निवडणुकीत मिळेल, या ही अपक्षा ठेवून शरद पवार गटाने परळीत मराठा उमेदवार दिला आहे. विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या 'मनसे'देखील मराठा समाजातील अभिजीत देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीBeedबीडDhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस