रवीना टंडन, भारती सिंग, फराह खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या; बीडमध्ये गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2019 16:43 IST2019-12-28T16:36:00+5:302019-12-28T16:43:07+5:30

यासोबतच कार्यक्रम निर्माता हुजेफा क्युजर यांच्याविरुध्द बीडमध्ये गुन्हा दाखल

Raveena Tandon, Bharti Singh, Farah Khan hurt religious sentiments; Filed FIR in Beed | रवीना टंडन, भारती सिंग, फराह खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या; बीडमध्ये गुन्हा दाखल

रवीना टंडन, भारती सिंग, फराह खान यांनी धार्मिक भावना दुखावल्या; बीडमध्ये गुन्हा दाखल

बीड : टीव्ही चॅनलवरील ‘बँक बेंचर्स’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याबद्दल रवीना टंडन, भारती सिंग, फराह खान तसेच कार्यक्रमाचा निर्माता हुजेफा क्युजर यांच्याविरुध्द शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

ख्रिसमसच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या ‘बँक बेंचर्स’ या एका कार्यक्रमादरम्यान फराह खान, अभिनेत्री रवीना टंडन आणि भारती सिंह यांनी  ख्रिश्चन समाजाच्या धार्मिक प्रतीकावर भाष्य केले होते. यातून समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या या बाबत येथील अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे अध्यक्ष आशिष जयराज शिंदे यांनी २७ डिसेंबर रोजी फिर्याद दिली होती. याप्रकरणी २८ डिसेंबर रोजी शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करुन तो मालाड पोलीस ठाणे, मुंबई येथे वर्ग करण्यात आला आहे.

दरम्यान,  या तीन लोकप्रिय अभिनेत्रींविरोधात पंजाब येथे सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या नंतर  फराह खानने या प्रकरणी ट्वीट करत माफी मागितली आहे. 

Web Title: Raveena Tandon, Bharti Singh, Farah Khan hurt religious sentiments; Filed FIR in Beed