सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 13:29 IST2020-09-14T13:27:26+5:302020-09-14T13:29:19+5:30

लग्नास नकार दिल्याने पीडितेने विष प्राशन केले

rape of a minor girl by making friendship on social media | सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

सोशल मीडियावर मैत्री करून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

ठळक मुद्देतरुणावर गुन्हा दाखल आरोपी फरार आहे

अंबाजोगाई (जि. बीड) : केज तालुक्यातील तरु णाने अंबाजोगाई तालुक्यातील अल्पवयीन युवतीसोबत सोशल मीडियावर मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने युवतीने विष प्राशन केले. याप्रकरणी बर्दापूर ठाण्यात त्या तरुणावर पोक्सोसह बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

फारुख मुस्तफा शेख (रा. आडस, ता. केज) असे  आरोपीचे नाव आहे, तर १७ वर्षीय अल्पवयीन पीडिता  बारावीत आहे. यावर्षी जानेवारीत सोशल मीडियावर त्यांची ओळख झाली. या ओळखीचा फायदा घेत फारुखने  दुचाकीवर बसवून परळीच्या जुन्या औष्णिक विद्युत केंद्राजवळ तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर लग्नास नकार दिल्याने पीडितेने विष प्राशन केले. पीडितेवर अंबाजोगाईच्या स्वाराती रु ग्णालयात उपचार करण्यात आले. याप्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून फारुख मुस्तफा शेख याच्यावर  गुन्हा नोंद करण्यात आला. याप्रकरणी फौजदार रविराज जमादार तपास करीत असून फरार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यात येत आहे.
 

Web Title: rape of a minor girl by making friendship on social media