विवाहित महिलेवर बलात्कार; खामगाव येथील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:32+5:302021-07-02T04:23:32+5:30
सिरसाळा : घरात कुणीही नाही, याचा गैरफायदा घेत एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर एकाने बलात्कार केल्याची घटना २९ रोजी ...

विवाहित महिलेवर बलात्कार; खामगाव येथील घटना
सिरसाळा : घरात कुणीही नाही, याचा गैरफायदा घेत एका ४५ वर्षीय विवाहित महिलेवर एकाने बलात्कार केल्याची घटना २९ रोजी उघडकीस आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सिरसाळापासून जवळच असलेल्या खामगाव येथे पीडित महिला ही घरी एकटीच असल्याचे पाहून आरोपी लहू लिंबाजी घडवे याने बळजबरी करून जीवे मारण्याची धमकी देऊन हा प्रकार केला. कुणाला सांगितले तर तुला गावात राहू देणार नाही म्हणून बलात्कार केल्याची फिर्याद पीडित महिलेने आरोपी लहू लिंबाजी घडवे (रा. खामगाव) याच्याविरुद्ध सिरसाळा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील आरोपी हा फरार झाला असून, पुढील तपास महिला अत्याचार आयोगाच्या पथकाचे एपीआय गायकवाड यांच्याकडे देण्यात आला आहे