फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 11:27 IST2025-01-08T11:21:57+5:302025-01-08T11:27:51+5:30

सीआयडी विष्णू चाटेच्या घराचीही घेणार झडती, चाटेच्या मोबाइलचा शोध लागेना

Ransom demanded over phone; CID to take Walmik Karad's Voice sample today | फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

फोनवरून मागितली खंडणी; सीआयडी वाल्मीक कराडचा आज घेणार व्हाईस सॅम्पल

बीड : मस्साजोगमधील अधिकाऱ्याला खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मीक कराड याचे व्हाइस सॅम्पल बुधवारी घेतले जाणार आहे. तसेच दुसरा आरोपी विष्णू चाटे याच्या घराची झडतीही घेतली जाणार आहे. त्याचा मोबाइल जप्त करण्यासाठी सीआयडीकडून तपास सुरू आहे.

केज तालुक्यातील मस्साजाेग येथील पवणचक्कीचे काम करणाऱ्या आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. या प्रकरणी केज ठाण्यात वाल्मीक कराडसह विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील चाटेला अटक केली होती, तर कराड हा शरण आला आहे. घुले हा सध्या सरंपच संतोष देशमुखह हत्या प्रकरणात आरोपी आहे. मंगळवारी चाटेला न्यायालयात हजर केले होते. त्याने मोबाइल दिला नाही. तसेच तपासात सहकार्य करत नसल्याचे सांगत सीआयडीने त्याची पोलिस कोठडी घेतली होती. जवळपास २० दिवसांपासून चाटे हा सीआयडीच्या कोठडीत आहे, तर कराडदेखील सध्या अटकेत आहे. परंतु, तपासात काय उघड झाले, हे मात्र सीआयडीकडून सांगितले जात नाही. त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

कराडचे फोनवर संभाषण
अधिकाऱ्याने दिलेल्या फिर्यादीत विष्णू चाटे याच्या मोबाइलवरून वाल्मीक कराड याचे संभाषण झाले होते. त्यामुळे त्याचे व्हाईस सॅम्पल घेण्यासह इतर १३ मुद्द्यांवर कराडची काेठडी घेतली होती. त्याप्रमाणे बुधवारी त्याचे व्हाईस सॅम्पल घेतले जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरपंच हत्या प्रकरणात मौन
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातही सात आरोपी सीआयडी कोठडीत आहेत. परंतु, त्यांच्याकडून तपासात काय समोर आले, याबाबत सीआयडीकडून मौन बाळगले जात आहे.  तपासावर गोपनीयता पाळली जात आहे.

Web Title: Ransom demanded over phone; CID to take Walmik Karad's Voice sample today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.