शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रानमेवा : बालाघाटाच्या डोंगरातील सीताफळे धारुरच्या आठवडी बाजारात, प्रक्रिया उद्योगाअभावी भाव मिळेना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2017 11:31 IST

धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

ठळक मुद्दे बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते. तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. 

- अनिल महाजन

धारूर (बीड) : बालाघाटाच्या डोंगरामध्ये नैसर्गिकरित्या उगवलेल्या झाडांपासून सीताफळाचे उत्पादन मिळते. मागील २० दिवसांपासून सीताफळे बहरात आले आहेत. धारूर येथील आठवडी बाजार तसेच इतर दिवशीही सीताफळे विक्रीस येत आहेत. मात्र, येथे प्रक्रिया उद्योग नसल्याने ती कवडीमोल दरात विक्री होत आहेत.

तालुक्यातील जमीन हलक्या प्रतीची व मुरमाड आहे. या जमिनीत नैसर्गिकरीत्या उगवलेली सीताफळांची खुरटी झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा वापर केला जात नसल्याने ही सीताफळे सेंद्रीय प्रकारात मोडतात. चवीला मधुर व रसाळ असल्याने या सीताफळांना राज्याबाहेरही मागणी असते.  या वर्षी पावसामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत.

तालुक्यात ६ हजार ६०० हेक्टर जमीन वनविभागाच्या ताब्यात आहे. बहुतांश जमीन डोंगराळ असल्याने मोठया प्रमाणात सीताफळांची झाडे आहेत . या जमिनीत वनविभागामार्फत दरवर्षी सीताफळांच्या झाडांची लागवड करण्यात येते. वनजमिनीतून मिळणा-या सीताफळांचा दरवर्षी लिलाव करण्यात येतो. यातून ५० ते ६० हजार रुपयांचे उत्पन्न वनविभागाला मिळते.या वर्षी काही खंडानंतर पावसाने समाधानकारक हजेरी लावली आहे. यामुळे सीताफळे चांगली पोसली आहेत. मागील २० दिवसांपासून महिला मजूर, सुटी असल्याने शाळकरी मुले सीताफळांची तोडणी करुन आठवडी बाजारात विक्रीस आणू लागले आहेत. 

व्यापारी टोपलीवर भाव ठरवून खरेदी करतात. एका टोपलीतून " १५० ते २०० मिळतात. एक विक्रेता दिवसातून दोन टोपलीच्या जवळपास   सीताफळे विक्री करतात. परिसरातील काही व्यापारी  सीताफळांची कवडीमोल किंमतीत खरेदी करतात व नंतर इतर बाजारात पाठवितात. सीताफळ तोडणीपासून तीन ते चार दिवसात खाण्यायोग्य होते. नंतर ते खराब होत असल्याने त्याची साठवणूक करता येत नाही. खरेदी केलेली सीताफळे टेम्पोच्या सहाय्याने औरंगाबाद, मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर तसेच गुजरात राज्यातील सुरत, अहमदाबाद इ.  ठिकाणी विक्रीस नेतात. सीताफळाच्या व्यवसायातून दरवर्षी ४० ते ५० लाखांची उलाढाल होते.

राजकीय नेतृत्वाच्या अभावाने प्रश्न रखडला - साधारणत: पावसाळ्याच्या सुरुवातीला जून-जुलै महिन्यात पानगळ झाल्यास सीताफळांच्या झाडांना कळ्या लागण्यास सुरुवात होते.- पावसाळ्याच्या कालावधीत चांगला पाऊस झाल्यास सीताफळे लवकर पोसली जातात.- सप्टेंबर-आॅक्टोबर महिन्यात सीताफळे परिपक्व होतात. सीताफळ कळ्या येण्यापासून तोडणीपर्यंत चार महिन्यांचा कालावधी लागतो.- धारूर येथे सीताफळावर प्रक्रिया उद्योग व्हावा अशी अनेक दिवसांपासून नागरिकांची मागणी आहे. परंतु प्रभावी राजकीय नेतृत्त्वाअभावी हा प्रश्न कायमस्वरूपी सखडलेला आहे.- तालुक्यातून दरवर्षी मोठ्या प्रमाणात उसतोड कामगार  स्थलांतर करतात. सीताफळ प्रक्रिया उद्योग उभा राहिल्यास हे स्थलांतर थांबू शकेल. - येथील सीताफळास जी. आय. मानांकन ही मिळालेले आहे. प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी लोकप्रतिनिधींच्या इच्छाशक्तीची गरज आहे.