शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

मराठा आरक्षणासाठी बीडमध्ये रणरागिणींचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2018 23:21 IST

मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या.

ठळक मुद्देपरळी, केज, माजलगाव, गेवराईत ठिय्या आंदोलन सुरुच

बीड : मराठा समाजाला तात्काळ आरक्षण लागू करावे या प्रमुख मागणीसह इतर विविध मागण्यांसाठी सोमवारी दुपारी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. यामध्ये हजारोंच्या संख्येने युवती, महिला सहभागी झाल्या होत्या. हातात विविध मागण्यांचे फलक घेऊन निघालेल्या मोर्चात महिलांनी दिलेल्या घोषणांनी बीड शहर दणाणून गेले होते. अतिशय शिस्तबद्ध असलेला हा मोर्चा शांततेत पार पडला.

मराठा समाजाला आरक्षण देण्यासह शासकीय नोकरीतील मेगाभरती रद्द करा, मराठा आंदोलकांवरील दाखल गुन्हे मागे घ्या, मराठा आरक्षण आंदोलनात बलिदान दिलेल्या युवक, युवतींना शहीद घोषित करा, मराठा विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह तात्काळ चालू करा, अण्णासाहेब पाटील महामंडळास केलेल्या आर्थिक तरतुदीची तात्काळ अंमलबजावणी करा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा यासारख्या विविध मागण्यांसाठी बीड जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर महिलांचा मोर्चा काढण्यात आला.

वाहतुकीसाठी एक मार्ग खुला ठेवावाजिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकल्यानंतर एका बाजूने मोर्चेकºयांनी बसावे, दुसºया बाजूने वाहतुकीसाठी मार्ग खुला ठेवावा. यामुळे मोर्चाही शिस्तबद्ध व शांत वाटेल तसेच सर्वसामान्य वाहनधारकांचे हाल होणार नाहीत. यापुढे मोर्चेकºयांनी याची काळजी घेण्याची गरज आहे.

माजलगावात ठिय्या सुरुचमाजलगांव : आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास सोमवारी सहा दिवस झाले असून, ठिय्या आंदोलन सुरूच आहे. माजलगाव काँग्रेस, अल्पसंख्यांक काँग्रेस व युवक काँग्रेसने आंदोलनास पाठिंबा जाहर केला.पोलिसांकडून तगडा बंदोबस्तकायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टीने बीड पोलिसांकडून ठिकठिकाणी तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. महिलांचा मोर्चा असल्याने जिल्ह्यातील सर्व महिला अधिकारी, कर्मचाºयांना मोर्चाच्या बंदोबस्तासाठी पाचारण करण्यात आले होते.

आठ दिवसाला रक्तदान कराकेज : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी रक्तदान आंदोलन करण्यात येणार आहे. संकलित केलेले रक्त केवळ चाळीस दिवसच टिकते. नंतर टाकून द्यावे लागते. त्यामुळे अतिरिक्त रक्त जमा होऊ नये व आपल्या रक्ताचा उपयोग व्हावा यासाठी एकाच दिवशी रक्तदान न करता आठ दिवसाला एकदा रक्तदान करा असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी केज येथे ठिय्या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आल्यानंतर केले. आरक्षणाच्या मागणीसाठी युवकांनी आत्महत्या करु नयेत, असे आवाहन केले. यावेळी अंकुश इंगळे, दिलीप गुळभिले, भाई मोहन गुंड, विलास जोगदंड, मुकुंद कणसे, विनोद गुंड, बालासाहेब गलांडे, राम माने, पशुपतीनाथ दांगट, अमर पाटील, धनंजय देशमुख आदींची उपस्थिती होती.

गेवराईपर्यंत दुचाकी रॅलीगेवराई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी येथील शास्त्री चौकात बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू आहे. रविवारी रात्री येथे भजन, कीर्तन झाले. सोमवारी चौथ्या दिवशी तालुक्यातील पाचेगाव आणि उमापूर सर्कल परिसरातील गावांतून तरूणांनी घोषणाबाजी गेवराईपर्यंत दुचाकी रॅली काढली. यात ७० पेक्षा जास्त युवक सहभागी झाले होते.

ब्राह्मण समाजाचा पाठिंबाकेज : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनास केज ब्राह्मण संघटनेने जाहीर पाठिंबा दिला. यावेळी धनंजय कुलकर्णी यांनी निवेदन केले. यावेळी ब्राह्मण संघटनेचे सतीश केजकर, श्रीनिवास केजकर, चंद्रकांत पाटील, बाळासाहेब कुलकर्णी उमरीकर आदी उपस्थित होते.

४० आंदोलकांना जामीन मंजूरगेवराई : मराठा समाजाला आरक्षणाच्या मागणीसाठी गेवराईत अर्धनग्न आंदोलनानंतर भाजपा आ. लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर आंदोलकांनी ठिय्या देऊन सरकारविरोधी जोरदार घोषणाबाजी केल्यानंतर झालेल्या दगडफेक प्रकरणी सुमारे ५२ व्यक्तिंसह ४० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा नोंद झाला होता. यापैकी ४० जणांना अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवारी अटकपुर्व जामीन मंजूर केला. जिल्हा न्यायालयातील वकिलांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून हे प्रकरण नि:शुल्क लढविले.

केजमध्ये चौथ्या दिवशीही ठिय्याकेज : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी केज येथे चौथ्या दिवशीही ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनात तालुक्यातील उंदरी व गांजी येथील सकल मराठा समाज सहभागी झाला. उंदरी येथील सकल मराठा समाजाच्या वतीने आंदोलकांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आंदोलनात ज्येष्ठ नागरिकांसह तरूणांचा सहभाग होता.

टॅग्स :BeedबीडMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाMarathwadaमराठवाडा