पारगाव-जोगेश्वरीतील गावठी दारू अड्ड्यावर धाड; ३००० लिटर रसायन नष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2023 19:07 IST2023-08-05T19:06:58+5:302023-08-05T19:07:08+5:30

आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नजरा चुकवून गावठी दारूचा अड्डा सुरू होता.

Raid on Gavathi liquor factory in Pargaon-Jogeshwari; 3000 liters of chemicals destroyed | पारगाव-जोगेश्वरीतील गावठी दारू अड्ड्यावर धाड; ३००० लिटर रसायन नष्ट 

पारगाव-जोगेश्वरीतील गावठी दारू अड्ड्यावर धाड; ३००० लिटर रसायन नष्ट 

- नितीन कांबळे 
कडा (बीड) : 
 पारगाव-जोगेश्वरी येथील गावठी दारूच्या अड्ड्यावर धाड टाकत पोलिसांनी ३००० हजार लिटर रसायन व साहित्य असा एक लाखांचा मुद्देमाल नष्ट केला. ही कारवाई आष्टी पोलिसांनी शनिवारी दुपारी केली.

आष्टी तालुक्यातील जोगेश्वरी पारगाव येथे गेल्या अनेक महिन्यांपासून पोलिसांच्या नजरा चुकवून गावठी दारूचा अड्डा सुरू होता. शनिवारी याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी या अड्ड्यावर धाड टाकळी. यावेळी गावठी दारू बनविण्यासाठीचे तीन हजार लिटर रसायन, तयार दारू, साहित्य नष्ट करण्यात आले. पोलिसांनी तीन जणांवर  गुन्हे दाखल केला असून पुढील कारवाई सुरु आहे. 

ही कारवाई आष्टीचे उपअधीक्षक अभिजीत धाराशिवकर याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस,पोलीस हवालदार राजेंद्र काकडे,पोलिस हवालदार उदावंत,पोलीस नाईक संतोष दराडे, पोलिस शिपाई राऊत व महिला दारूबंदी पथक यांनी केली.

Web Title: Raid on Gavathi liquor factory in Pargaon-Jogeshwari; 3000 liters of chemicals destroyed