बीड तालुक्यात साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:32 AM2021-02-13T04:32:22+5:302021-02-13T04:32:22+5:30

कापूस खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी बीड : तालुक्यात आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून, आतापर्यंत ...

Purchase of 3.5 lakh quintals of cotton in Beed taluka | बीड तालुक्यात साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी

बीड तालुक्यात साडेतीन लाख क्विंटल कापसाची खरेदी

Next

कापूस खरेदीसाठी मुदतवाढीची मागणी

बीड : तालुक्यात आतापर्यंत ३ लाख ४९ हजार ३२८ क्विंटल कापसाची खरेदी झाली असून, आतापर्यंत १० हजार शेतकऱ्यांचा कापूस खरेदी करण्यात आला आहे, तर नोंदणी केलेल्या २,२२३ शेतकऱ्यांचा कापूस मापाच्या प्रतीक्षेत आहे. कापूस खरेदी १६ तारखेपर्यंत करण्याच्या सूचना आहेत. चार दिवसात शेतकरी नोंदणीनुसार शिल्लक कापसाची खरेदी प्रक्रिया होणे अशक्य असल्याने कापूस खरेदीसाठी ३० मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.

शासकीय हमीदराने बीड तालुक्यात १८ नोव्हेंबर रोजी कापूस खरेदीला सुरुवात झाली होती. एकूण १२ जिनिंगवर खरेदी केंद्र आहेत. यात पणन महासंघाचे २ व कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची १० केंद्र आहेत.

जिनिंग केंद्र शेतकरी खरेदी

जयश्री जिनिंग नामलगाव ७८४ २६,५४५

संकल्प, मोची पिंपळगाव ४४४ १४,५१७

नगदनारायण, साक्षाळपिंप्री ३९७ १२,६७२

पद‌्मावती, नाथापूर ३४४ १२,५१०

एस. आर. कॉटन, नामलगाव १५२७ ५०,४५१

पार्वती जिनिंग, घोसापुरी १४९३ ४९,२७०

शौर्य, कुमशी ६६८ २३,४५७

नर्मदा काॅटन, मैंदा १०३७ ३६,४५२ साई कॉटेक्स, सा. बोरगाव ५०१ १९,००९

यशोदीप, मांजरसुंभा ४४० १३,७५५

कल्पतरू जिनिंग ३५४ १२,८३३

सद‌्गुरू जिनिंग २१९८ ७७,८५१

हमीभावातही घसरण

शासनाने कापसाचा हमीदर ५ हजार ७२५ रुपये क्विंटल असा जाहीर केला होता. मात्र, नंतरच्या टप्प्यात ५ हजार ६१५ रुपये क्विंटलप्रमाणे भाव मिळाला. कापसाचा दर्जा हे एकमेव कारण सांगण्यात येत होते. खासगी व्यापाऱ्यांनी मात्र ५ हजार ४०० ते ५ हजार ५०० रुपये क्विंटलप्रमाणे खरेदी केला.

कापूस विक्रीसाठी नोंदणी केलेले शेतकरी १२,२२३

कापूस मोजमाप झालेले शेतकरी १०,०९०

आतापर्यंत एकूण कापूस खरेदी ३,४९,३२८.३१ क्विंटल

Web Title: Purchase of 3.5 lakh quintals of cotton in Beed taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.