नोकरी, घराचे आमिष देऊन पुण्याच्या महिलेवर परळीत अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2021 17:33 IST2021-11-22T17:31:28+5:302021-11-22T17:33:22+5:30

परळी : ‘नोकरी लावतो, घर देतो’, असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची घटना येथे २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. ...

Pune woman raped in parali by giving job, house lure | नोकरी, घराचे आमिष देऊन पुण्याच्या महिलेवर परळीत अत्याचार

नोकरी, घराचे आमिष देऊन पुण्याच्या महिलेवर परळीत अत्याचार

परळी : ‘नोकरी लावतो, घर देतो’, असे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केल्याची घटना येथे २१ नोव्हेंबर रोजी उघडकीस आली. पीडित महिला पुण्याची असून, सोलापूर हे तिचे मूळ गाव आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या.

यातील पीडित ३६ वर्षीय महिलेच्या तक्रारीनुसार, गणेश कोडी (२४, रा. गणेशपार, परळी) याने तिला फूस लावून पुण्यातून परळीत आणले. महिला विवाहित असून, सोलापूरची मूळ रहिवासी आहे. सध्या पुण्यात राहते. ‘तुला नोकरीला लावतो, राहण्यासाठी घर देतो’, असे सांगून गणेश याने तिच्यावर वेळोवळी अत्याचार केला. दरम्यान, १९ व २० नोव्हेंबर रोजी पीडितेवर त्याने अतिप्रसंगाचा प्रयत्न केला. त्याच्या त्रासाला वैतागून महिलेने शहर पोलीस ठाण्यात येत तक्रार दिली. त्यावरुन रविवारी पहाटे बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक भार्गव सपकाळ, उपनिरीक्षक वैशाली पेटकर यांनी तपासचक्रे गतिमान केली.

गुन्हा दाखल होताच शहर पोलिसांनी गणेश कोडीला ताब्यात घेतले. त्याला रविवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती पोलीस निरीक्षक उमाशंकर कस्तुरे यांनी दिली.

Web Title: Pune woman raped in parali by giving job, house lure