परळीच्या दोन वारकरी महिलांचा पुण्यात अपघाती मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 14:17 IST2018-07-04T14:16:24+5:302018-07-04T14:17:04+5:30
मोशी येथे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला.

परळीच्या दोन वारकरी महिलांचा पुण्यात अपघाती मृत्यू
परळी/ पुणे : मोशी येथे आज सकाळी ६ वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वारकरी महिलांचा मृत्यू झाला. जनाबाई अनंता साबळे (५५) आणि सुमनबाई वैजनाथ इंगोले (६०) अशी मृतांची नावे असून त्या परळी येथील रहिवासी होत्या.
बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई मधून एक दिंडी देहूकडे येत होती. याच दिंडीत जनाबाई आणि सुमनबाई आल्या होत्या. मोशी मधील बोहाडेवस्ती येथे मंगळवारी (दि. 3) रात्री ही दिंडी मुक्कामाला थांबली.
आज पहाटे उपबाजार समिती चौकात रस्ता ओलांडत असताना जनाबाई आणि सुमनबाई यांना त्यावेळी अचानक भरधाव वेगात आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या धडकेत दोघीही गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ उपचारासाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.