शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

भाजीपाल्यासोबत डाळही अवाक्याबाहेर; मसूर डाळीने भूक भागविली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST

बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले ...

बीड : उन्हाळ्यात स्वस्त मिळणारा भाजीपाला आता पावसाळी वातावरणामुळे महाग झाला आहे. यातच डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत पोहोचलेले आहेत. महागाई आवाक्याबहेर जात असल्याने सामान्य कुटुंब आर्थिक अडचणींचा सामना करीत आहे. पावसाळ्यात नेहमी भाज्यांचे दर वाढतेच राहिले आहेत. उघडीप मिळेपर्यंत आणि बाजारात चांगली आवक होईपर्यंत चढे भाव राहणार आहेत. यातच आगामी श्रावणातील सण, उत्सवामुळे आणि डाळींच्या साठवणुकीबाबतच्या नियमांमुळे येत्या काही दिवसात डाळींचे दर भडकणार असल्याचे संकेत आहेत. त्यामुळे इतर डाळींच्या तुलनेत स्वस्त असणाऱ्या मसूर डाळीचा वापर वाढत असल्याचे बाजारातील सूत्रांनी सांगितले.

डाळींचे दर (प्रती किलो)

हरभरा - ७०

तूर - १००

मूग - १००

उडीद -१००

मसूर - ७५

२) भाजीपाल्याचे भाव (प्रती किलो)

बटाटा -२०

कांदा - २०

टोमॅटो - ३०

काकडी - २०

दोडके - ६०

गवार - ६०

शेवगा -१००

लिंबू - २०

कोथिंबीर जुडी -२०० रुपये शेकडा

पालक जुडी - २०० रुपये शेकडा

मेथी जुडी- ४०० रुपये शेकडा

म्हणून डाळ महागली

मेपर्यंत डाळींचे भाव १० ते २० रुपये किलोपर्यंत वाढले होते. ते जूनमध्ये उतरले आहेत. मात्र तरीही डाळींचे भाव १०० रुपये किलाेपर्यंत आहेत.

आयात धोरण, साठवणुकीबाबत मर्यादा, वाहतूक दरवाढीमुळे काही अंशी भाववाढ झाली. पर्याय व बदल म्हणून मसूर डाळीचा वापर वाढला असला तरी तूर, मूग, हरभरा डाळींनाच चांगली मागणी आहे. स्टॉक मर्यादेचा डाळींच्या दरावर परिणाम होणार नाही, आगामी सणासुदीतही हेच भाव राहण्याची शक्यता असल्याचे व्यापारी गंगाबिशन करवा म्हणाले.

म्हणून भाजीपाला कडाडला

लॉकडाऊन काळातही पुरेशा प्रमाणात भाज्यांची आवक होती. त्यामुळे दर स्वस्त होते. उघडीप नसल्याने व रिपरिप पावसामुळे भाज्यांची तोडणी करण्यास अडथळे येत आहेत. ठोक बाजारात सध्या आवक कमी आहे. तसेच बाहेरगावाहून वाहतुकीद्वारे फळभाज्या आणाव्या लागतात. त्यामुळे भाजीपाल्यांचे भाव वाढल्याचे भाजी विक्रेता हुजेब बागवान यांनी सांगितले.

सर्वसामान्यांचे हाल

गॅसच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. यातच भाजीपाल्याचे दर चांगलेच वाढले आहेत. डाळींचे भाव शंभर रुपये किलोपर्यंत आहेत. व्यापार, व्यवहारांवर आधीच कोरोनाचा परिणाम झाल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. -- शुभांगी भरडे, गृहिणी, बीड.

-----------

मागील वर्षापासून महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांच्या गरजेच्या व जीवनावश्यक वस्तूंचे भाव नियंत्रणात ठेवायला हवेत. रोजच्या आहारात तूर, हरभरा व मूग डाळीचाच वापर केला जातो. त्यामुळे मसूर डाळ स्वस्त असली तरी कमी प्रमाणातच वापरतो. - अर्चना राठौर, गृहिणी, बीड.

----------