बडेरा परिवाराकडून स्वाराती रुग्णालयास स्ट्रेचर प्रदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:29 IST2021-03-14T04:29:40+5:302021-03-14T04:29:40+5:30
अंबाजोगाई : रुग्णसेवेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली तर रुग्णालयाला अनेक सुविधा लोकसहभागातून प्राप्त होतील. यासाठी दात्यांनी रुग्णसेवेसाठी ...

बडेरा परिवाराकडून स्वाराती रुग्णालयास स्ट्रेचर प्रदान
अंबाजोगाई : रुग्णसेवेसाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत केली तर रुग्णालयाला अनेक सुविधा लोकसहभागातून प्राप्त होतील. यासाठी दात्यांनी रुग्णसेवेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते नंदकिशोर मुंदडा यांनी केले. अंबाजोगाई येथील प्रसिद्ध व्यापारी तथा सामाजिक कार्यकर्ते सुभाष व अशोक बडेरा परिवाराच्यावतीने स्वाराती वैद्यकीय महाविद्यालयात तीन स्ट्रेचर देण्यात आले. या लोकार्पण सोहळ्याचे प्रमुख अतिथी म्हणून नंदकिशोर मुंदडा बोलत होते. यावेळी मेडीसीन विभागाचे प्रमुखे डॉ. सिद्धेश्वर बिराजदार, सामाजिक कार्यकर्ते गिरीधारीलाल भराडिया, भारतीय जैन संघटनेचे विभागीय अध्यक्ष धनराज सोळंकी, नगरसेवक सारंग पुजारी, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. राकेश जाधव, सुभाष बडेरा यांची उपस्थिती होती.
यावेळी नंदकिशोर मुंदडा म्हणाले, रुग्ण आणि नातेवाईकांसोबत जोडले गेलेले ऋणानुबंध वाढविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. शासन आपल्याला सर्व सुविधा देत असलेतरी आपणही लोकसहभागातून काम केले पाहिजे. महिनाभरापूर्वीच बडेरा यांनी रुग्णालयात २० व्हिलचेअर दिल्या होत्या आणि आज तीन स्ट्रेचर दिले. रुग्णसेवेसाठी ही उपकरणे दिलासादायक ठरणारी आहेत, असे मत डॉ. सिद्धेश्वर बिराजदार यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक धनराज सोळंकी यांनी केले. अशोक बडेरा यांनी उपस्थितांचे आभार मानले.
===Photopath===
130321\avinash mudegaonkar_img-20210313-wa0039_14.jpg
===Caption===
बडेरा परिवाराकडून अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयास स्ट्रेचर प्रदान करण्यात आले.