राज्य सरकारचा पुतळा जाळून मराठा आंदोलकांकडून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:34 IST2021-03-17T04:34:17+5:302021-03-17T04:34:17+5:30
यावेळी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष ...

राज्य सरकारचा पुतळा जाळून मराठा आंदोलकांकडून निषेध
यावेळी मराठा समाजाच्या वतीने राज्यभर गांधीगिरी पद्धतीने आंदोलन सुरू केले होते. राज्य सरकारने व केंद्र सरकारने जातीने लक्ष घालून तत्काळ न्याय द्यावा, यासाठी साष्टपिंपळगाव राज्यव्यापी ठिय्या आंदोलक सुरू आहे. येथील आंदोलक खासदार शरद पवार यांना निवेदन देणार होते. यात येथील मनोज जरांगे पाटिल, संजय कटारे, शहादेव औटी, दादासाहेब राक्षे, सुनील औटे, सतीश बोचरे, संपत शिंदे, हे बारामतीला जाणार होते. त्या जाण्याच्या अगोदर या सरकारने मराठा आरक्षणाचा आवाज दाबून आंदोलन चिरडण्याचा डाव केला आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. त्यामुळे तालुक्यातील खळेगाव येथील संतप्त मराठा युवकांनी सरकारचा प्रतीकात्मक पुतळा जाळून जोरदार घोषणाबाजी करीत राज्य सरकारचा जाहीर निषेध केला. दरम्यान, यावेळी गावातील असंख्य युवक एकत्र येऊन सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्या म्हणत जोरदार घोषणाबाजी केली. जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही. तोपर्यंत लढा सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.