शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
2
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
3
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
4
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
5
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
6
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
7
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
8
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
9
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
10
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
11
डीआरआयचे 'सिमोल्लंघन'; कोकेन प्रकरणात दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादवर नजर, तस्करांविरुद्ध जोरदार आघाडी
12
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
13
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
14
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
15
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
16
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
17
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
18
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
19
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
20
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
Daily Top 2Weekly Top 5

आमदारांच्या मर्जीतील सीओंवर समर्थक नगरसेवक नाराज - A

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

माजलगाव : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप ...

माजलगाव : येथील नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे नगराध्यक्ष व पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता मनमानी कारभार करत असल्याचा आरोप होत आहे. यामुळे शुक्रवारी होणाऱ्या विशेष सभेत मुख्याधिकाऱ्यांविरुद्ध अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

केज येथील मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्याकडे ८-१० महिन्यांपूर्वी माजलगाव नगरपालिकेचा पदभार देण्यात आला होता. दोन-तीन महिने पदभार सांभाळल्यानंतर त्यांची या ठिकाणी कायमस्वरूपी मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती झाली. भोसले हे अनुभवी व शिस्तबद्ध मुख्याधिकारी आहेत, असे बोलले जात होते; परंतु त्यांनी सुरुवातीपासूनच नगराध्यक्ष व नगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना विचारात न घेता काम सुरू केले. ८ महिन्यांपूर्वी नगरपालिकेने पाणी, स्वच्छता, लिकेज काढणे आदी टेंडर काढले होते; परंतु हे टेंडरधारक मुख्याधिकाऱ्यांच्या जवळचे असल्याने ते त्यांच्या व्यतिरिक्त कोणाचेच ऐकत नव्हते. कधी टेंडर बंद तर कधी चालू, असे प्रकार सुरू आहेत. या टेंडरचालकांवर मुख्याधिकाऱ्यांचे नियंत्रण नसल्याने शहरात जागोजागी लिकेज व घाणीचे साम्राज्य दिसून येत आहे. शहरातील नागरिकांना पिण्यासाठी पुरवठा केले जाणारे पाणी विनाफिल्टर असल्याने नागरिकांना दूषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. यामुळे नगरसेवकांना प्रभागात फिरणे अवघड झाले आहे. माजलगाव नगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर आल्याने नगरसेवकांना पुन्हा मतदारांसमोर जायचे असल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांवर अविश्वास ठराव आणून त्यांना मेडिकल रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

विशेष सभेत होणार चर्चा

नगराध्यक्ष शेख मंजूर यांनी मंगळवारी अजेंडा काढून शुक्रवारी विशेष सभा बोलावली आहे. या सभेत मुख्याधिकाऱ्यांच्या कामाचे अवलोकन करून पुढील कामकाजाविषयी निर्णय होणार आहे. तसेच मालमत्ताकर मूल्यांकन व पाणीपट्टी व आर्य वैश्य व मराठा भवनाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत या बैठकीत विचारविनिमय होणार आहे.

मुख्याधिकारी आमदारांचे विश्वासू

नगरपालिकेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे येथील आमदारांचे अतिशय विश्वासू असल्याने ते मनमानी करत असल्याचे नगरसेवकातून बोलले जात होते. यामुळे भोसले यांच्यावर अविश्वास आणून आमदारांनाच आव्हान देण्याचे काम त्यांच्याच मर्जीतील नगराध्यक्ष व नगरसेवक करत असल्याचे दिसत येत आहे.