पालेभाज्यांचे दर घसरले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:25 IST2021-06-04T04:25:59+5:302021-06-04T04:25:59+5:30
अपघात वाढले अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ...

पालेभाज्यांचे दर घसरले
अपघात वाढले
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात ग्रामीण भागात रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू आहेत. कामे करण्यासाठी ठिकठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळे होत आहे. तर रस्त्यावरील खड्डे चुकविताना लहान-मोठ्या अपघातांच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. आजपर्यंत अनेकांना या खड्ड्यांमुळे मोठा त्रास सहन करावा लागला.
कार्यालयात शुकशुकाट, नागरिक त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरात अनेक कार्यालयांमध्ये कर्मचारी स्वत:च्या टेबलवर न बसता कार्यालय परिसरात जास्त प्रमाणात थांबलेले असतात. तर अनेक कर्मचारी बेपत्ता असल्याचे दिसून येत आहे. नागरिक आपल्या कामासाठी विविध शासकीय कार्यालयात हेलपाटे घालतात; मात्र त्यांना कर्मचारी भेटत नसल्याने आल्या पावली परत जाण्याची वेळ येते. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांंनी लक्ष द्यावे. अशी मागणी होत आहे.
पार्किंग नसल्याने वाहतुकीस अडचण
अंबाजोगाई : अंबाजोगाई शहरातील सावरकर चौक ते सायगाव नाका या मुख्य रस्त्यावर पार्किंगची सुविधा नसल्याने वाहतुकीस मोठे अडथळे निर्माण होतात. या मुख्य रस्त्यावर बँका, रुग्णालय यांची मोठी संख्या आहे. प्रत्येक ग्राहक बँकेत जाताना दुचाकी बाहेर लावतो. यामुळे या परिसरात वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होते. या परिसरात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अभिजित जगताप यांनी केली आहे.
विनामास्क प्रवाशांनाही ऑटोरिक्षामध्ये प्रवेश
अंबाजोगाई : विनामास्क प्रवाशांनाही अॅाटो रिक्षामध्ये प्रवेश दिला जात आहे. पूर्वी मास्क असल्याशिवाय रिक्षाचालक प्रवाशांना अथवा ग्राहकांना रिक्षात बसू देत नव्हते;मात्र आता बेफिकीरी वाढत चालली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव जोमाने असतानाही पुन्हा नो मास्क नो एंट्री ही मोहीम सुरू करून ग्राहकांना मास्कची सक्ती करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते वैजनाथ देशमुख यांनी केली आहे.
कमी दाबाने वीजपुरवठा, शेतकरी त्रस्त
अंबाजोगाई : अंबाजोगाई तालुक्यात शेतीसाठी होणारा वीजपुरवठा अत्यंत कमी दाबाने सुरू आहे. कमी दाबाने वीजपुरवठा होऊ लागल्याने विद्युत पंप सुस्थितीत चालत नाहीत. ते सतत बंद पडत आहेत. महावितरणने ग्रामीण भागातील वीजपुरवठा सुरळीत करून पूर्ण क्षमतेने व मोठ्या दाबाने विद्युत पुरवठा उपलब्ध करून दिला तर सिंचनाची गैरसोय दूर होईल.