शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
3
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
4
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
5
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
6
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
7
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
8
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
9
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
11
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
12
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
13
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
14
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
15
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
16
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
17
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
18
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
19
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
20
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

सलग दोन दिवस वीज पुरवठा विस्कळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:42 IST

परळी : सोमवारी रात्री शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून सर्वत्र अंधारच अंधार होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वीज ...

परळी : सोमवारी रात्री शहरातील वीज पुरवठा विस्कळीत झाला असून सर्वत्र अंधारच अंधार होता. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास वीज पुरवठा सुरू झाला पण मंगळवारी पुन्हा सकाळी वीज पुरवठा विस्कळीत झाला. दुपारपर्यंत वीज गूल झाली होती.

शहरात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडाव वाढल्याने नागरिक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा वीज गूल होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे, पिठाच्या गिरण्या बंद पडत आहे. तसेच पंखे बंद पडत असल्याने घरात गरम होण्याचे प्रकार वाढले आहेत.

गेल्या तीन महिन्यात विजेच्या वाढत्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त झाले असून वीज वितरण कंपनीच्या कारभाराविषयी परळीकरांमध्ये असंतोष दिवसेंदिवस वाढू लागला आहे. येथील वीज वितरण कार्यालयातील अधिकारी कामात निष्काळजी करत असल्याचा आरोप करत हयगयी करणारे अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते लालासाहेब देशमुख यांनी केला आहे.

सोमवारी रात्री ८ वाजल्यापासून वीज गूल झाली असून साडेनऊपर्यंत विजेचा पत्ता नव्हता त्यामुळे शहरात रात्रीचा अंधार होता. शहरातील सर्वच भागात वीज पुरवठा सुरळीत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढत्या उष्णतेमुळे आधीच परळीकर त्रस्त आहेत. त्यातच वीज पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे अधिकच त्रासून गेले आहेत याकडे देशमुख यांनी लक्ष वेधले असून वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे विजेचा लपंडाव वाढला असल्याचे म्हटले आहे.

यासंदर्भात येथील अतिरिक्त कार्यकारी अभियंता आंबडकर म्हणाले की, सोमवारी रात्री शहरातील परिसरात लाईनमध्ये बिघाड झाल्याने वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. काही भागात रात्री पावणे दहा सुमारास वीज पुरवठा सुरळीत झाला.

भाजपाचे शहर उपाध्यक्ष राजेंद्र ओझा म्हणाले की, सोमवारी दिवसातून अनेक वेळा वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत आहे. गेल्या काही दिवसांपासून वीज पुरवठा विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. वीज पुरवठा विस्कळीत कशामुळे होतो, वीज वितरणाच्या झालेल्या शहरातील बोगस कामाची चौकशी करा, अशी मागणी राजेंद्र ओझा यांनी केली आहे.