शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
4
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
5
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
6
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
7
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
8
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
9
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
10
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
11
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
12
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
13
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
14
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
15
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
16
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
17
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
18
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
19
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
20
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास

Pooja Chavan Suicide Case: शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करा; पूजा चव्हाणच्या वडिलांची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार

By सुमेध उघडे | Updated: March 2, 2021 18:57 IST

Pooja Chavan Suicide Case: संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकत जात आहे.

ठळक मुद्देशांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा पुजाशी काहीही संबंध नसताना त्या खोटे आरोप करत आहेतत्यांचे सर्व आरोप खोटे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा

परळी : पूजा चव्हाण प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा आरोप शांताबाई राठोड या महिलेने केला होता. हा आरोप खोटा आहे. हा आरोप करणारी महिला शांताबाई राठोडवर गुन्हा दाखल करावा अशी तक्रार पुजाच्या वडिलांनी आज परळी शहर पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यामुळे या प्रकरणाला आता आणखी एक वळण मिळाले आहे. 

संजय राठोड यांनी पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामुळे राजीनामा दिला असला तरी यावरून निर्माण झालेला वाद शमण्याऐवजी अधिकच भडकत जात आहे. पूजा चव्हाण यांच्या कुटुंबीयांनी रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र देऊन संजय राठोड यांचा बळी देऊ नका असा उल्लेख केला होता. त्यानंतर पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतल्याचा दावा केल्याचा गौप्यस्फोट केला. हे आरोप फेटाळून लावत लहू चव्हाण यांनी पूजाच्या मृत्यूबाबत कोण काय बोलतंय ते माहिती नाही, आम्ही आमच्या दु:खात आहोत, शांताबाई या आमच्या लांबच्या नातेवाईक आहेत परंतु त्यांच्यासोबत कसलेच नातेसंबंध नाहीत असे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर मंगळवारी त्यांनी परळी पोलीस स्टेशनमध्ये शांताबाई राठोड यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. यानुसार, काही लोक स्वतःच्या फायद्यासाठी पूजा आणि आमच्याबद्दल अफवा पसरवून बदनामी करत आहेत. शांताबाई राठोड यांचा आमच्याशी किंवा पुजाशी काहीही संबंध नसताना त्या या प्रकरणात मौन बाळगण्यासाठी तिच्या आईवडिलांनी पाच कोटी रुपये घेतले असे वक्तव्य करत आहेत. त्यांचे सर्व आरोप खोटे असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करावा असे म्हटले आहे. 

पुरावे योग्यवेळी देऊ शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पुणे पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद रोखठोक भूमिका मांडली. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला जोवर न्याय मिळणार नाही तोवर लढा दिला जाणार आहे. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

टॅग्स :Pooja Chavanपूजा चव्हाणSanjay Rathodसंजय राठोडPoliceपोलिसBeedबीड