११ दिवसांमध्ये १०१ टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 00:08 IST2020-01-12T00:07:33+5:302020-01-12T00:08:52+5:30
जिल्ह्यातील शक्ती महिला सुरक्षा पथकांनी ११ दिवसात १०१ टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार शक्ती महिला सुरक्षा पथकांनी २६१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली.

११ दिवसांमध्ये १०१ टवाळखोरांवर पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्ह्यातील शक्ती महिला सुरक्षा पथकांनी ११ दिवसात १०१ टवाळखोरांवर कारवाई केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या आदेशानुसार शक्ती महिला सुरक्षा पथकांनी २६१ शाळा, महाविद्यालयांना भेटी दिल्या. ८३ टवाळखोरांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कारवाई करण्यात आली. तसेच १६ टवाळखोरांना कलम १४९ प्रमाणे नोटीस बजावण्यात आली. अंबाजोगाई पोलीस ठाण्यातील पथकाने दोन टवाळखोरांवर खटले भरले होते. या दोघांना न्यायालयाने २१०० रुपये दंड केला.
टवाळखोरांवर कारवाईबरोबरच शक्ती पथकांनी विविध २० महिला बचत गटांना भेटी देऊन महिला विषयक कायद्याची माहिती दिली. तसेच छेडछाड प्रतिबंधासाठी जागृती निर्माण केली. पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली शक्ती महिला सुरक्षा पथकांनी कार्यवाही केली.